Cotton Market Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Market : बारामती बाजार समितीत कापूस खरेदी-विक्रीस प्रारंभ

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २) उघड लिलाव पद्धतीने कापूस खरेदी-विक्री सुरू झाली.

Team Agrowon

बारामती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Baramati Bazar Samiti) बुधवारी (ता. २) उघड लिलाव पद्धतीने कापूस खरेदी-विक्री सुरू झाली. बारामती मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष जवाहर वाघोलीकर व बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, प्रशासक मिलिंद टांकसाळे यांच्या हस्ते या खरेदी-विक्रीस प्रारंभ झाला.

‘‘बारामती बाजार समितीची ओळख कॉटन मार्केट (Cotton Market) म्हणून होती. येथे दीड लाख क्विंटल आवक होत होती. आता पुन्हा ३५ वर्षांनंतर परत कापसाचे लिलाव होत असल्याने याचा आनंद होत आहे,’’ अशी भावना वाघोलीकर यांनी व्यक्त केली.

वाघोलीकर म्हणाले, ‘‘भविष्यात येथे कापसाची मोठी आवक होईल. कॉटन मार्केट म्हणून बारामती बाजारपेठ विकसित होईल. पूर्वीप्रमाणे तालुक्यातील इतर संस्थांनी जिनिंग उभारून सहभाग घ्यावा. त्यामुळे कापसाला चांगले दिवस येतील.’’ पहिल्या दिवशी कापसाची ३० क्विंटल आवक होऊन ८९०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी ७५०० रुपये दर निघाला. कापसाचे लिलाव दर बुधवारी व शनिवारी होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT