Banana  Agrowon
ताज्या बातम्या

Banana Seedling : सोलापुरात केळीच्या रोपांची टंचाई

सध्या सोलापूर जिल्ह्यात केळीच्या रोपांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन काही नामांकित कंपन्यांच्या अधिकृत विक्रेत्यांकडून १६ रुपयांचे रोप २५ रुपये इतक्या चढ्या दराने विकले जात आहे.

Team Agrowon

Banana Cultivation News : करमाळा तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रासह माढा, माळशिरस, पंढरपूर, इंदापूर (जि. पुणे) येथे केळी लागवडीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळला आहे.

कारखान्यांचा गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) सुरू झाल्यानंतर ऊस गाळपास पाठवून जमिनीची मशागत करून केळी लावण्यासाठी (Banana Cultivation) शेतकऱ्यांनी जमीन तयार केली आहे.

परंतु, रोपांच्या मागणीत वाढ झाल्याने नामांकित कंपन्यांच्या रोपांमध्ये तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना केळीची रोपे मिळत नसल्याचे चित्र आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्यात केळीच्या रोपांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन काही नामांकित कंपन्यांच्या अधिकृत विक्रेत्यांकडून १६ रुपयांचे रोप २५ रुपये इतक्या चढ्या दराने विकले जात आहे.

तर नामांकित रोपवाटिकेतील रोपांच्या नावाखाली विक्रेते इतर स्थानिक रोपवाटिकेतील रोपांची विक्री करत आहेत. अशा स्थानिक रोपवाटिकेतील रोपांची निर्मिती करताना विशेष काळजी न घेतल्याने केळी बागा लवकर रोगास बळी पडतात.

परिणामी मालाचा दर्जाही राखला जात नाही. एका बाजूला केळीला उच्चांकी दर मिळत असताना रोप विक्रेत्यांकडून होत असलेल्या पिळवणुकीमुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशा लोकांवर कारवाईची मागणी होत आहे.

चांगले व्यवस्थापन केल्यास मुबलक उत्पन्न

केळी पिकाला वर्षभर समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आता ऊस पिकाला फाटा देऊन केळी पिकाकडे आपला मोर्चा वळविला आहे. केळी उत्पादनातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार मिळत आहे.

परिणामी, उजनी लाभक्षेत्र परिसरात केळी पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. केळी बागेचे खत व पाणी व्यवस्थापन चांगले केल्यास पिकातून चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते.

केळी रोपांच्या खरेदीसाठी गेलो असता आता पैसे भरल्यावर सहा महिन्यांनी रोपे मिळतील, असे सांगण्यात येते. परंतु, निश्चित किमतीपेक्षा जास्त पैसे दिले तर आठ दिवसांत रोपे दिली जातात. तर अनेक विक्रेत्यांकडून नामवंत कंपन्यांच्या नावाखाली स्थानिक रोपवाटिकेतील रोपांची भेसळ करून विक्री केली जात आहे.
दिग्विजय पवार, केळी उत्पादक, वाशिंबे
केळीच्या रोपांची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडून करावी. खरेदी करताना रीतसर पावती घ्यावी. विक्रेता निश्चित किमतीपेक्षा रोपांची चढ्या दराने विक्री करत असेल तर शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, करमाळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT