Banana Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Banana Cultivation : जाचक अटींमुळे ‘रोहयो’तून केळी लागवड अत्यल्प

Rojagar Hami Yojana : या योजनेतून केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला विविध टप्प्यात म्हणजेच रोपांची लागवड, खते देणे, तणनियंत्रण आदी कार्यवाहीसंबंधी हेक्टरी दोन लाख ६५ हजार रुपये अनुदान देय आहे.

Team Agrowon

Jalgaon News : केळी लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार हमी योजना केळी पिकाला लागू केली. परंतु योजनेचे जाचक निकष शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत असून, जिल्हाभरात १० प्रस्तावदेखील या योजनेतून मागील दोन ते तीन महिन्यांत मार्गी लागलेले नसल्याचे चित्र आहे.

या योजनेतून केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला विविध टप्प्यात म्हणजेच रोपांची लागवड, खते देणे, तणनियंत्रण आदी कार्यवाहीसंबंधी हेक्टरी दोन लाख ६५ हजार रुपये अनुदान देय आहे. परंतु लागवडीसाठी निर्देशित कंपनीकडून उत्पादीत केळीची उतिसंवर्धित रोपे घ्यावीच लागणार आहेत.

लाभार्थी शेतकरी हा जॉब कार्डधारक असावा, ज्या क्षेत्रात केळी लागवड करायची आहे, त्या क्षेत्रात यापूर्वी या योजनेतून फळ बाग लागवड केलेली नसावी, लाभार्थी निवृत्तिवेतनधारक, शासकीय कर्मचारी असल्यास संबंधितांनाही लाभ मिळत नाही.

लागवडीनंतर दोन खोडवा पीक घेणे बंधनकारक

केळी लागवडीनंतर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीदेखील संबंधित क्षेत्रात केळी पीक असावे, अशीही अट आहे. अर्थात लाभार्थी शेतकऱ्याला दोन वेळेस खोडवा किंवा पिलबाग केळी संबंधित क्षेत्रात घ्यावी लागेल.

केळी हे बहुवार्षिक पीक नाही. नऊ ते १० महिन्यांत केळीची काढणी पूर्ण होते आणि शेतकरी पीक फेरपालटीसाठी त्या क्षेत्रात विविध इतर पिके घेतात. यामुळे ही अट मोठा अडथळा आहे. ही अट दूर करण्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

दोन हेक्टरवरील क्षेत्रधारकांनाही अडचण

ज्या शेतकऱ्यांची किंवा एका कुटुंबाची सामूहिक जमीन, शेती दोन हेक्टरपेक्षा अधिक एका खात्यावर किंवा उताऱ्यावर दिसते, अशा शेतकऱ्यांनादेखील लाभ दिला जात नाही. खानदेशात केळी उत्पादक मोठे शेतकरी मानले जातात. अर्थात त्यांच्याकडे एका खात्यावर किंवा उताऱ्यावर तीन हेक्टर, चार हेक्टर किंवा यापेक्षा अधिकच्या जमिनीची नोंद आहे.

७० टक्के केळी उत्पादक अल्पभूधारकांत दिसत नाहीत. काही केळी उत्पादकांच्या सातबाऱ्यावर दोन हेक्टर ३० आर एवढे क्षेत्र दिसते. अशा शेतकऱ्यांनाही लाभ मिळत नाही. शासनाने कमाल दोन हेक्टर क्षेत्रासंबंधी लाभ द्यावा परंतु ज्या शेतकऱ्यांच्या सातबाराउताऱ्यावर दोन हेक्टरपेक्षा अधिक जमिनीची किंवा क्षेत्राची नोंद आहे, त्यांनाही लाभ मिळावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

शासन योजना आणते, पण त्यात कुणी सहभागी होणार नाही, अशा अटी समाविष्ट केल्या जातात. यामुळे योजना फक्त कागदावर दिसतात. असाच प्रकार केळीसंबंधी रोजगार हमी योजनेबाबत झालेला दिसत आहे.
- श्रीकांत पाटील, शेतकरी, कठोरा, ता. जि.जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT