Lumpy Disease Kolhapur agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Disease Kolhapur : गुरांचा बाजार, शर्यती, प्रदर्शन भरवण्यावर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

Lumpy Skin Disease : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, भुदरगड, गारगोटी, राधानगरी तालुक्यात लम्पी संसर्गरोगाने थैमान घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, भुदरगड, गारगोटी, राधानगरी तालुक्यात लम्पी संसर्गरोगाने थैमान घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आदेश जारी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गायवर्णीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वीर्यमात्रेतूनही हा रोग गायवर्णीय जनावरांमध्ये पसरत असल्याने वीर्यमात्रा संकलन थांबवावे असे सांगण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, जनावरांच्या वाहतुकीला बंदी व गायवर्णीय जनावरांचे बाजार बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा रोग सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणून तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मागचा एक महिना जिल्ह्यात गायवर्णीय जनावरांना होणाऱ्या लम्पी आजाराने थैमान घातले आहे. जिल्ह्यात सध्या ३ ते ४ हजारांवर जनावरे या आजाराने बाधित आहेत. तर शेकडो जनावरे दगावली आहेत.

यामुळे पशुपालन करणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 'लम्पी' झालेली गायवर्णीय जनावरे अलगीकरणात ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु दिवसा ऊन आणि रात्री गार वारा यामुळे जनावरे पुन्हा आजारी पडत आहेत.

दुभत्या जनावरांकडून दूध उत्पादन कमी होत आहे. दिवसेंदिवस या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. हा आजार आटोक्यात यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत.

त्यामुळे गायवर्णीय जनावरे ने-आण करण्यास मनाई केली आहे. गायवर्णीय गुरांचा बाजार भरवणे, शर्यती लावणे, जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे यासाठी देण्यात येणारे सर्व परवाने देणे रद्द करण्यात आले आहेत. या रोगाचा प्रसार थांबवा, यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिका यांच्यामार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे, कीटकनाशक फवारणी मोहीम राबवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नैसर्गिक संयोगाकरिता वापर करावा

लम्पी चर्मरोगाचा विषाणू विर्यामधूनही बाहेर पडत असल्याने वीर्यमात्रा बनविणाऱ्या संस्थांमार्फत होणारे वीर्य संकलन थांबवावे व वळूची चाचणी करून नकारार्थी आलेल्या वळूचे वीर्य संकलन करणे किंवा नैसर्गिक संयोगाकरिता वापर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT