Akola Z P Agrowon
ताज्या बातम्या

Akola ZP : राष्ट्रपतींच्या हस्ते अकोला जिल्हा परिषदेला पुरस्कार

जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्व्हेक्षण करून दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत देशात सर्वोत्तम जिल्ह्याचा मान पटकविणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेला शनिवारी (ता. ३) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने गौरविण्यात आले.

Team Agrowon

अकोला ः जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्व्हेक्षण (Divyang Survey) करून दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत देशात सर्वोत्तम जिल्ह्याचा मान पटकविणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेला शनिवारी (ता. ३) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

दिल्लीतील विज्ञान भवनात ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना’निमित्त सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र सिंह, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि श्रीमती प्रतिमा भौमिक उपस्थित होते.

अपंगत्वावर मात करीत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या देशातील दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, राज्य आणि जिल्हा आदींना या वेळी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिव्यांगांच्या सशक्तीकरणाकरिता शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या श्रेणीत अकोला जिल्हा परिषदेला गौरविण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT