ताज्या बातम्या

MPKV Rahuri : कै. बाळासाहेब वाघ यांच्या नावे राहुरी कृषी विद्यापीठात पुरस्कार

कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने १९७० मध्ये के. के. वाघ शिक्षण संस्थेची स्थापना झाली. संस्था स्थापनेपासून कै. वाघ २००६ पर्यंत संस्थेचे ‘उपाध्यक्ष’ तर २००६ ते २०२३ संस्थेचे ‘अध्यक्ष’ होते.

Team Agrowon

नाशिक : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात (MPKV, Rahuri) नुकताच ३६ वा पदवीदान समारंभ पार पडला.

याप्रसंगी शासकीय कृषी महाविद्यालय (Government College of Agriculture), पुणे येथे २०२१-२२ या वर्षी बी.एससी (कृषी) या शाखेत महाविद्यालयातून सर्व विषयांत प्रथम तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न सर्व कृषी महाविद्यालयांतून बी.एससी (कृषी) या शाखेत विद्यापीठात प्रथम आलेल्या अपूर्वा वामन या विद्यार्थिनीला कै. बाळासाहेब देवराम वाघ यांच्या नावे दोन सुवर्णपदके प्रदान करत सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे ऑनलाइन तर कृषिमंत्री अब्दुल सत्तार, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, डॉ. चारुदत्त मायी, राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरदराव गडाख आदी उपस्थित होते.

कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने १९७० मध्ये के. के. वाघ शिक्षण संस्थेची स्थापना झाली. संस्था स्थापनेपासून कै. वाघ २००६ पर्यंत संस्थेचे ‘उपाध्यक्ष’ तर २००६ ते २०२३ संस्थेचे ‘अध्यक्ष’ होते.

तब्बल ५१ वर्षे त्यांनी खंबीरपणे संस्थेची धुरा सांभाळली. संस्थारूपी रोपट्याचे त्यांनी वटवृक्षात रूपांतर केले. संस्था उभारणीत त्याचा सिंहाचा वाटा होता. या पार्श्‍वभूमीवर संस्थेच्या वतीने २०२१-२२ पासून दरवर्षी त्यांच्या नावे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात दोन सुवर्ण पदके दिली जाणार आहेत.

पहिले सुवर्ण पदक हे शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथून बी.एससी (अॅग्री) या शाखेत प्रथम तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न सर्व कृषी महाविद्यालयांमधून बी.एससी (अॅग्री) या शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला दुसरे सुवर्ण पदक दिले जाणार आहे. कै. बाळासाहेब देवराम वाघ हे शासकीय कृषी महाविद्यालय, पुणेचे माजी विद्यार्थी होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT