Solar Pump Agrowon
ताज्या बातम्या

Solar Pump : सौरपंप दुरुस्तीसाठी पुरवठादार कंपनीकडून टाळाटाळ

Agriculture Irrigation : सध्या पावसाने खंड दिल्याने शेतकरी पीक वाचवण्यासाठी सिंचनाची धडपड करीत आहेत.

Team Agrowon

Buldana News : सध्या पावसाने खंड दिल्याने शेतकरी पीक वाचवण्यासाठी सिंचनाची धडपड करीत आहेत. पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्याने लावलेला सौरपंप चालत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत शेतकऱ्याने मेडाकडे तक्रार दिली असून संबंधित कंपनीकडून दुरुस्तीबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हटले आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी येथील पंढरीनाथ उगले, राधाकिसन उगले या शेतकऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी सौरऊर्जा कृषिपंप घेतला आहे. टाटा कंपनी व ओसवाल कंपनीकडून हे पंप बसवून दिले आहेत. सध्या सौरऊर्जा पंप सुरू होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हेल्पलाइनवर अनेक वेळा संपर्क करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. या दोन्ही शेतकऱ्यांनी जानेवारी २०२२ मध्ये टाटा ऊर्जा कंपनीचे सौरपॅनेल व ओसवाल कंपनीचे मोटरपंप आणि स्टार्टर बसवलेले आहे. कंपनीच्या ५ कर्मचाऱ्यांनी जोडणी केल्यानंतर हे सौरपॅनेल व पंप १ महिनाभर सुरळीत चालले. मात्र ते चालेनासे झाले.

याबाबत कंपनीने बुलडाणा येथील टेक्निशियनकडे तक्रार केल्यानंतर त्याने २५ जुलै २०२३ ला पाहणी केली. त्यांच्याकडून दुरुस्ती झाली नाही. दुसरी तक्रार कंपनीने दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर अनेक वेळा केली.

परंतु कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा गेल्या महिन्यात दोन वेळा हेल्पलाइनवर तक्रार केली. कंपनीकडून अद्यापही प्रतिसाद मिळत नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. ५) अकोला येथील महाऊर्जा जिल्हा व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT