Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : विमा कंपन्यांची मुजोरी शेतकऱ्यांच्या मुळावर

विमा उतरविलेल्या शेतकऱ्यास ७२ तासांचे आत नुकसानीबाबत कंपनीस कळण्याकरिता टोल क्रमांक देण्यात आला.

Team Agrowon

Nagpur News : पीक विमा (Crop Insurance) उतरविलेल्या शेतकऱ्यांना किती लाभ व कशाच्या आधारावर देण्यात आला, उर्वरित लाभ केव्हा देण्यात येईल, शंभर टक्के नुकसान (Crop Damage) झाले तरी नुकसानभरपाई (Compensation) का देण्यात आली नाही.

याबाबत पीक विमा कंपनीच्या नरखेड तालुक्यातील प्रतिनिधीला विचारणा केली. मात्र, त्यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिल्याचा आरोप माजी सभापती वसंत चांडक यांनी केला आहे.

पंतप्रधान पीक विमा योजने (Crop Insurance Scheme) अंतर्गत नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकाचा विमा उतरला. या वर्षात अतिवृष्टी व सतत पाऊस पडत असल्यामुळे पिकांची नासाडी झाली. शेतकऱ्यांना खरीप हंगामात नुकसान सहन करावे लागले.

शासनाकडून ॲपवर पेरा नोंद करण्याचे जाहीर झाले. तलाठ्याकडील पेरा पत्रकाचे काम शेतकऱ्यास करावे लागले.

विमा उतरविलेल्या शेतकऱ्यास ७२ तासांचे आत नुकसानीबाबत कंपनीस कळण्याकरिता टोल क्रमांक देण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी सूचना दिल्या. अनेकांना नोंद करता आली नाही. ही वस्तुस्थिती आहे.

कृषी विभागांनी शेतकऱ्यांची नोंद व्हावी, याकरिता शेतकऱ्यांच्या सातबारा, आठ-अ, आधार कार्ड, पॉलिसी सत्यप्रत प्रमाणपत्र गोळा केले. विमा कंपनीकडून अंशकालीन कर्मचाऱ्यांनी तक्रारीनुसार काहीच शेतकऱ्यांचे पंचनामे केले.

पण प्रत्यक्षात मात्र विमा कंपनीने क्लेम फार्मवर शेतकऱ्यांची स्वाक्षरी घेऊन माहितीचा स्वतःच भरणा केला. ही माहिती शेतकऱ्यास कळविण्यात आली नाही, असा आरोपही वसंत चांडक यांनी केला. जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे याबाबत मागणी नोंदविण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT