Water Storage Agrowon
ताज्या बातम्या

Water Storage : मराठवाड्यातील उपलब्ध पाणीसाठा 94 टक्‍क्‍यांवर

यंदा मराठवाड्यातील बहुतांश, लहान मोठे प्रकल्प तुडूंब झाले आहेत.पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या अतिजोरदार व सततच्या पावसाने प्रकल्प तुडूंब होण्यात मोठी मदत झाली.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : यातील आठही जिल्ह्यातील उपलब्ध उपयुक्‍त पाणीसाठा (Water Storage) 94 टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रकल्पातील 98.71 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठ्यासह मध्यम प्रकल्पातील 95.51 टक्‍के व लघू प्रकल्पातील 81.90 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठ्याचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने (Department Of Water Resource) देण्यात आली.

यंदा मराठवाड्यातील बहुतांश, लहान मोठे प्रकल्प तुडूंब झाले आहेत.पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या अतिजोरदार व सततच्या पावसाने प्रकल्प तुडूंब होण्यात मोठी मदत झाली. 18 नोव्हेंबरपर्यंतच्या पाणीसाठ्यानुसार, मोठ्या 11 प्रकल्पात 98.74 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. मोठ्या 11 प्रकल्पांपैकी 8 प्रकल्प तुडूंब असून त्यामध्ये जायकवाडी, येलदरी, माजलगाव, मांजरा, उध्‌र्वपेनगंगा, निम्न तेरणा, विष्णुपुरी व सिनाकोळेगाव या प्रकल्पांचा समावेश आहे.

सिद्‌धेश्‌वर प्रकल्पात 98 टक्‍के, निम्न मनार प्रकल्पात 97 टक्‍के तर निम्न दुधना प्रकल्पात 75 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. 75 मध्यम प्रकल्पात 95.51 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्‌ध आहे. या मध्यम प्रकल्पांपैकी 46 प्रकल्पांत 100 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. 75 पैकी 68 प्रकल्पात 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे.

749 लघू प्रकल्पांपैकी 603 लघू प्रकल्पात 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त, 53 प्रकल्पात 50 ते 75 टक्‍के, 37 प्रकल्पात 25 ते 50 टक्‍के, 43 प्रकल्पात 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्‌ध आहे. याशिवाय 13 लघू प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील 5, जालना व लातूरमधील प्रत्येकी एक व उस्मानाबाद तसेच बीडमधील प्रत्येकी 3 लघू प्रकल्पाचा समावेश आहे.

आठ जिल्ह्यांतील पाणीसाठा असा...

त्यामध्ये औरंगाबादमधील 9, बीडमधील 12, उस्मानाबादमधील 14, लातूरमधील 7, नांदेडमधील 3 व परभणीतील एका प्रकल्पाचा समावेश आहे. 749 लघू प्रकल्पात 82 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला असून, त्यामध्ये सर्वात कमी पाणीसाठा औरंगाबाद जिल्ह्यातील 97 लघू प्रकल्पात 69 टक्‍के, जालना जिल्ह्यातील 57 प्रकल्पात 79 टक्‍के, बीड जिल्ह्यातील 126 प्रकल्पात 92 टक्‍के, लातूर जिल्ह्यातील 134 प्रकल्पात 95 टक्‍के, उस्मानाबादमधील 206 प्रकल्पात 68 टक्‍के, नांदेड जिल्ह्यातील 80 प्रकल्पात 97 टक्‍के, परभणी जिल्ह्यातील 22 प्रकल्पात 85 टक्‍के तर हिंगोली जिल्ह्यातील 27 लघू प्रकल्पात 88 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्‌ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT