Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

शिंदखेडा तालुक्यातील १४३ गावांची सुधारित पैसेवारी जाहीर झाली आहे. सर्वच गावांची खरीप हंगामातील पिकांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा जास्त लागू झाली.

Team Agrowon

दोंडाईचा, जि. धुळे ः शिंदखेडा तालुक्यातील १४३ गावांची सुधारित पैसेवारी जाहीर झाली आहे. सर्वच गावांची खरीप हंगामातील (Kharif season) पिकांची (Crop) सुधारित पैसेवारी ५० पेक्षा जास्त लागू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

अपेक्षित उत्पन्न नसल्याने अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी होईल का, अशी मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाकडे केली आहे. १५ डिसेंबरअखेर जाहीर होणाऱ्या अंतिम पैसेवारीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची स्थिती आहे. बागायतदार शेतकऱ्यांच्या विहिरी आजच उपशावर आलेल्या आहेत. प्रामुख्याने कापूस पिकाचे उत्पादन तालुक्यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर घेतले जाते. उर्वरित बाजरी, ज्वारी, भुईमूग व मुगाच्या पिकाची पेरणी यंदा वेळेवर पाऊस नसल्याने अत्यल्प प्रमाणात झाली. त्याचेही अपेक्षित उत्पन्न आले नाही. त्यामुळे दोंडाईचा बाजार समितीत यंदा शेतकरी मका पिकाव्यतिरिक्त उत्पादन विक्रीसाठी आणताना दिसले नाहीत.

सुधारित पैसेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत बहुतांश गावांतील ग्रामपंचायती, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी त्यावर हरकती घेतल्या आहेत. ५० पेक्षा कमी अंतिम पैसेवारी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. यावर तालुका प्रशासन अंतिम पीक पैसेवारी जाहीर करताना काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. पैसेवारी हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासनाकडून शेतकऱ्यास विविध प्रकारचे साह्य मिळण्यासाठी पीक पैसेवारी ५० पेक्षा कमी असावी, अशी मागणी आहे.

जाहीर केलेल्या पीक पैसेवारीवर हरकती घेतल्या आहेत. आम्ही पीक कापणी प्रयोग घेऊ. प्रसंगी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट घेतला जाईल.

- आशा गांगुर्डे, प्रभारी तहसीलदार, शिंदखेडा, जि. धुळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT