Animal Attack Agrowon
ताज्या बातम्या

Attacker Leopard : हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद

दोन चिमुकल्यांवर केला होता हल्ला

टीम ॲग्रोवन

भद्रावती, चंद्रपूर ः आयुध निर्माणी चांदा सेक्टर चारमधील वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. दोन चिमुकल्यांवरही बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केला. यात चिमुकले किरकोळ जखमी झाल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.

या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने या भागात पिंजरे लावले होते. अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. आयुध निर्माणीचा परिसर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच आहे. त्यामुळे या भागात नेहमीच वाघ, बिबट्यांचा वावर राहतो. गेल्या काही दिवसांपासून आयुध निर्माणी चांदा सेक्टर परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता.

त्याने दोन बालिकांवर हल्ला केला होता. यात त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. या घटनांची दखल घेत येथे पिंजरे लावले होते. अखेरीस बिबट्या या पिंजऱ्यात अडकला. विभागीय वन अधिकारी खाडे, सहाय्यक उपवनसंरक्षक निकिता चौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक विकास शिंदे, बीट वनरक्षक धनराज गेडाम,

सार्ड वन्यजीव संस्थेचे श्रीपाद भाकरे, अमोल कुचेकर, अनुप येरणे, प्रणय पतरंगे, आशीष चायकाटे, इम्रान पठाण, शैलेश पारेकर यांच्या सहकार्याने बिबट्यास जेरबंद करून वनविभागाच्या रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT