petroglyphs Agrowon
ताज्या बातम्या

Forest Department : कातळशिल्प संशोधनासाठी वन विभागाकडून मदत

कातळशिल्पांचे संशोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी मदत वन विभागाकडून केली जाईल, असे आश्‍वासन प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वन बल प्रमुख डॉ. वाय. एल. पी. राव यांनी दिले.

टीम ॲग्रोवन

रत्नागिरी ः कातळशिल्पांचे संशोधन (Petroglyphs Research) होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी मदत वन विभागाकडून (Forest Department) केली जाईल, असे आश्‍वासन प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वन बल प्रमुख डॉ. वाय. एल. पी. राव यांनी दिले.

प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख डॉ. वाय. एल. पी. राव यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील कातळशिल्पाबाबत सुधीर रिसबूड, नीलेश बापट यांच्याशी चर्चा केली. कातळशिल्प संशोधन होणे आवश्यक असल्याचे वन बल प्रमुखांनी स्पष्ट केले. तसेच रिसबूड यांना वन विभागाची मदत हवी असल्यास योग्य ती मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर रत्नागिरी वन विभागातील विविध कामांचा आढावा घेतला.

या वेळी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक मनिकंडन रामानुजम यांच्या उपस्थितीत विभागीय वनाधिकारी दीपक खाडे व सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांनी वन विभागांतर्गत चालू असलेल्या वन्यप्राणी बचाव मोहीम, कासव सफारी, मगर सफारी, प्राणी संग्रहालय, गड किल्ले संवर्धन, नैसर्गिक पाऊल वाटा, वन अमृत योजना, कोकणात मिळणारे काजू, फणस, कोकम, आंबा, नारळ, करवंद, जांभूळ, देशी केळी आदीपासून तयार होणारे पदार्थ, भात पिकाचे विविध प्रकारचे वाण याबाबत माहिती दिली.

तसेच डॉ. राव यांनी मालगुंड कासव संवर्धन केंद्राची पाहणीही केली. कासव अंडी घालून पिल्ले बाहेर येईपर्यंत सर्व पद्धतीची माहिती व गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील १४ कासव संवर्धन केंद्रामधून सोडण्यात आलेल्या पिल्लांची माहिती डॉ. राव यांनी घेतली. कासव संवर्धनाबाबत सुरू असलेल्या कामाबाबत डॉ. राव यांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, रत्नागिरी वन विभागाने तयार केलेल्या वन वणवा, कासव सफारी, बिबट बचाव कार्य, मगर सफारी या विषयावरील लघुपटाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनक्षेत्रपाल वैभव बोराटे, राजेश्री कीर आणि कर्मचारी उपस्थित होते.

वाहन, अन्य सुविधांसाठी निधी

वन्यप्राणी बचावासाठी आवश्यक वाहन आणि अन्य सुविधांसाठी आवश्यक निधी दिला जाईल, असे आश्‍वासन डॉ. राव यांनी दिले. तसेच कोल्हापूर मुख्य वनसंरक्षकांनी रत्नागिरी वन विभागातील कर्मचाऱ्यांना मगर व बिबट्या बचाव कार्यासाठी स्वतः तयार केलेल्या प्रतिकृतीची माहिती दिली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव आणि पेटेंट मिळविण्यासाठीचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT