Wild Vegetable  Agrowon
ताज्या बातम्या

Wild Vegetable : तणनाशक फवारणीमुळे रानभाज्यांची आवक तुरळक

Herbicide : पावसाळ्यात शेतात उगवणाऱ्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या पालेभाज्या, रानभाज्या या तणनाशकाच्या फवारणीने नामशेष होऊ लागल्या आहेत.

Team Agrowon

Palghar News : तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात अधिकतर भाग हा जंगलव्याप्त आहे, त्यामुळे या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती, फुले, वेली व फळांच्या स्वरूपात आढळतात; मात्र सध्या शेतीसाठी तणनाशक फवारणी केली जात आहे, त्यामुळे नैसर्गिक स्रोतांतून शेतात किंवा शेताच्या बांधावर किंवा बाजूच्या परिसरात उगवणारी रानभाजीही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.

पावसाळ्यात शेतात उगवणाऱ्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या पालेभाज्या, रानभाज्या या तणनाशकाच्या फवारणीने नामशेष होऊ लागल्या आहेत. पावसाळा आला की येथील नागरिकांना रानभाजीचे वेध लागतात.

अंबाडी, तरोटा, करटोली याची चव आजही जुने लोक विसरले नाहीत. बहुतांश नवीन व शहरी पिढीला या राजभाज्या माहीत नाहीत. शेतीवरील मजुरी खर्च कमी करण्याकरिता व मजुरांची वाढती टंचाई लक्षात घेता शेतात तणनाशक फवारणी करण्यात येत आहे. परिणामी, रानभाज्या दुर्मिळ झाल्या.

रानभाज्या जर शेतकऱ्यांनी वाचवल्या नाहीत तर त्या नामषेश होतील, त्यामुळे भावी पिढीला या भाज्या कशा होत्या याची माहितीसुद्धा नसेल. त्यामुळे या पिढीसाठी तसेच येणाऱ्या पिढीसाठीसुद्धा रानभाज्या वाचवणे आवश्यक आहे. हंगामानुसार रानभाज्या आरोग्यासाठी हितकारक असते. मात्र सध्या रानभाज्या मिळत नाहीत.
-विठ्ठल गोंदके, स्थानिक
पावसाळ्यात शेतात उगवणाऱ्या आंबाडी, करटुले, अळूची पाने, तरोटा, माट आदी रानभाज्या पावसाळ्यातील जेवणाची लज्जत वाढवतात. त्यामुळे कोणतीही फवारणी करताना ठराविक मात्रा देणे गरजेचे आहे.
- दीपक सोमवंशी, तालुका कृषी अधिकारी,जव्हार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT