Paddy Farming Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Farming : पावसाच्या आगमनाने भात रोपांना संजीवनी

Paddy Crop : वेळेवर पाऊस न झाल्याने पावसाच्या भरवशावर असेलल्या रोपवाटिका कोमेजू लागल्या होत्या. अशा परिस्थितीत जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे आगमन झाल्याने आता या भात रोपांना संजीवनी मिळाली आहे.

Team Agrowon

Paddy seedling : नाशिक ः जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात प्रामुख्याने इगतपुरी, त्रंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा यासह नाशिक व सिन्नर तालुक्यांतही भात लागवडी (Paddy Cultivation) असतात. दरवर्षी मृग नक्षत्राच्या अगोदरच भात लागवडीसाठी भात रोपे तयार करण्याची तयारी शेतकऱ्यांची सुरू असते.

मात्र चालू वर्षी वेळेवर पाऊस न झाल्याने पावसाच्या भरवशावर असेलल्या रोपवाटिका कोमेजू लागल्या होत्या. अशा परिस्थितीत जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे आगमन झाल्याने आता या भात रोपांना संजीवनी मिळाली आहे.

जिल्ह्यात भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८८,७७८ हेक्टर आहे. मागील वर्षी २०२२-२३ च्या खरीप हंगामात ९४,२२८ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली होती. तर चालु वर्षी ९२,२३८ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड प्रस्तावित आहे.

अधिक भात लागवडी इगतपुरी तालुक्यात असतात. पावसाअभावी रोपे तयार करणाऱ्यांसमोर अडचणीची परिस्थिती होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रोपांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी आहे.

भात रोपे तयार करण्याची लगबग
शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञान रुजत असून सुधारित पद्धतींचा अवलंब अलीकडच्या काळात करू लागले आहेत. त्यानुसार अधिक उत्पादकता असणाऱ्या भातवाणांची लागवड करून त्यांची रोपे तयार करण्याकडे कल आहे. यापूर्वी कामकाज पावसाअभावी खोळंबले होते. आता बियाणे खरेदीसह भात रोपे तयार करण्याची लगबग दिसत आहे.

पावसाची वेळेवर नसल्याने भात रोपे जळून चालली होती. मात्र आता पावसाने हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
- रामनाथ वाजे, भात उत्पादक शेतकरी, खेड भैरव, ता. इगतपुरी

पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे भात रोपांसाठी ७० टक्के पेरण्या झाल्या. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने कामकाज विस्कळीत झाले आहे. विहिरीला थोडे पाणी असल्याने बियाणे टाकले, ते जगतील की नाही शाश्वती नव्हती. आता पाऊस आल्यामुळे रोपे जगली आहेत. नाहीतर परिस्थिती अवघड होती.
- केशव पालवी, भात उत्पादकशेतकरी, ठाणगाव, ता. सुरगाणा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT