Chilli Agrowon
ताज्या बातम्या

Karnataki Chilli : चाकण उपबाजारात कर्नाटकी हिरवी मिरची आवक

प्रति दहा किलोला २५० ते ३०० रूपये दर

Team Agrowon

चाकण, जि. पुणे ः खेड उत्पन्न बाजार समितीच्या (Khed Produce Market Committee) चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात शनिवारी (ता.३१) कर्नाटक आणि नागपूर येथून हिरव्या मिरचीची (Green Chiili) सुमारे ३० टन आवक झाली. यावेळी मिरचीला प्रति १० किलोला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. आवक आणि मागणी स्थिर राहिल्याने दर देखील स्थिर होते, असे व्यापारी रवींद्र बोराटे (Ravindra Borate) यांनी सांगितले.

शनिवारी (ता.३१) बाजारात हिरव्या मिरचीसह मध्यप्रदेशातून हिरव्या वाटाण्याची सुमारे साठ टन आवक झाली. वाटाण्याला दहा किलोला २०० ते २२० भाव मिळाला. राजस्थान राज्यातून जोधपुरी गाजराची सुमारे ४० टन आवक झाली. गाजराला घाऊक बाजारात प्रति किलोला पंधरा रुपये भाव मिळाला, असे व्यापारी रवींद्र बोराटे म्हणाले. आबा गोरे, चांगदेव बोराटे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे या वेळी उपस्थित होते.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, सिमला या भागातून फळभाज्यांची आवक होत आहे. चाकण बाजारात पिंपरी चिंचवड, कोकण तसेच जिल्ह्यातून किरकोळ विक्रेते फळभाज्या खरेदी करण्यासाठी येतात. घाऊक बाजारात वांगी, भेंडी, गवार, पावटा, वाल यांचे भाव प्रति किलोला ६० ते ८० रुपये आहेत.

मध्यप्रदेशातील वाटाणा चाकण
मध्यप्रदेशातून सध्या हिरव्या वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. हिरवा वाटाण्याचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. हिरव्या वाटाण्याला प्रति किलोला २० ते २२ रुपये भाव आहे. हा भाव कमी आहे. त्यामुळे भाव वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. महाराष्ट्रात चाकण येथे मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेशातील वाटाणा विक्रीसाठी पाठविला जात आहे, असे मध्यप्रदेशातील शेतकरी, व्यापारी विवेक आर्य यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT