Pune APMC Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC : अडते असोसिएशनच्या बैठकीवरून आयोजनावरून तूं..तूं..मैं...मैं...

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडते असोसिएशनच्या निवडणुकीनंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीच्या आयोजनावरून सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pune APMC) अडते असोसिएशनच्या निवडणुकीनंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीच्या आयोजनावरून सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

असोसिएशनचा बदल अर्ज (चेंच रिपोर्ट) धर्मादाय आयुक्तांनी अद्याप स्वीकारलेला नसून, सध्याची कार्यकारिणी बेकायदा असल्याचा आरोप विरोधी गटाचे नेते अमोल घुले यांनी केला आहे. तर आम्ही घेतलेली बैठक कायदेशीर असल्याचा दावा असोसिएशनचे सचिव करण जाधव यांनी केला आहे.

अडते असोसिएशनच्या निवडणुकीत अनिरुद्ध ऊर्फ बापू भोसले विजयी झाले. मात्र या निवडीवर अध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार अमोल घुले आणि त्यांच्या पॅनेलचे प्रमुख माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांनी आक्षेप घेत, धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवर सुनावणी सुरू असून, अद्याप निवडणुकीचा बदल अर्ज धर्मादाय आयुक्तांनी स्वीकारला नसल्याचे घुले यांनी सांगितले आहे. यामुळे अडते असोसिएशनने गुरुवारी (ता.२२) घेतलेली वार्षिक सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे.

घुले यांच्या आरोपांबाबत बोलताना असोसिएशनचे सचिव करण जाधव म्हणाले, ‘‘वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ नये, असा आम्हाला न्यायालयाचा कोणताही आदेश नाही. आम्ही नियमानुसार सभा घेतली असून, सभेला ५०० पेक्षा जास्त सभासद उपस्थित होते. त्यांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला आहे.’’

‘शक्ती प्रदर्शनासाठी ३ लाखांची उधळपट्टी’

‘‘बेकायदेशीर वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी अडते असोसिएशनने संघटनेच्या बँक खात्यावरील तीन लाख रुपयांची उधळपट्टी केला आहे,’’ असा आरोपदेखील विरोधी गटाचे नेते अमोल घुले यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT