Talathi Recruitment  Agrowon
ताज्या बातम्या

Talathi Recruitment : ३११० तलाठी, ५१८ मंडल अधिकारी पदांना मान्यता

राज्यात ३११० तलाठी साझे व ५१८ महसुली मंडले निर्माण करण्यास आधीच शासनाने मान्यता दिली आहे.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : राज्यात ३११० तलाठी (Talathi) साझे व ५१८ महसुली मंडले निर्माण करण्यास आधीच शासनाने मान्यता दिली आहे. या साझे व महसुली मंडलांसाठी (Revenue Circle) ३११० तलाठी व ५१८ मंडल अधिकारी अशी एकूण ३६२८ पदे निर्माण करण्यास आता शासनाने मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्यांसंदर्भात अभ्यास करून शासनाला व्यवहार्य व अभ्यासपूर्ण शिफारशी करण्यासाठी फेब्रुवारी २०१४ व शासन शुद्धिपत्रक १८ फेब्रुवारी २०१४ अन्वये विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.

तलाठी साझा पुनर्रचना समितीने मंत्री परिषदेला २६ एप्रिल २०१६ रोजी सादर केलेला अहवाल व अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसासमिती गठित करावी. मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या अंतिम निर्णयार्थ सादर करावा, असा निर्णय घेतला गेला होता.

त्यानुसार शासन निर्णय १६ मे २०१६ नुसार महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित मंत्रिमंडळ उपसमितीने अहवाल मंत्रिमंडळाच्या अंतिम मान्यतेसाठी १६ मे २०१७ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला.

विभागनिहाय मंजूर तलाठी व मंडल अधिकारी पदे

जिल्हा तलाठी मंडळ अधिकारी

पुणे ६०२ १००

अमरावती १०६ १८

औरंगाबाद ६८५ ११४

कोकण ५५० ९१

मराठवाड्यातील जिल्हानिहाय तलाठी व मंडल अधिकारी पदे

जिल्हा तलाठी मंडल अधिकारी

औरंगाबाद ११७ १९

जालना ८० १३

परभणी ७६ १३

हिंगोली ६१ १०

बीड १३८ २३

नांदेड ८४ १४

लातूर ३९ ७

उस्मानाबाद ९० १५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT