Bunds Agrowon
ताज्या बातम्या

Painganga River : पैनगंगा नदीवरील उच्चपातळी सात बंधाऱ्यांना तत्त्वतः मंजुरी

मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील सात उच्च पातळी बंधाऱ्यांना सोमवारी (ता. ९) राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे‌.

Team Agrowon

हिंगोली ः मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील (Painganga River) सात उच्च पातळी बंधाऱ्यांना सोमवारी (ता. ९) राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे‌. हे बंधारे (Bunds) पूर्ण झाल्यानंतर १० हजार ६०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, अशी माहिती हिंगोली लोकसभा मतदारल संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी दिली.

खासदार पाटील म्हणाले, की या बंधाऱ्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. पैनगंगा नदी ही हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांची जीवन वाहिनी आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर आणि पुसद तालुक्यांतील शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा मोठा लाभ होणार आहे.

या नदीवरील इसापूर धरणाने शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागविली आहे. परंतु अनेक कालवे नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही. त्यामुळे पैनगंगा कयाधू नदी खोऱ्यातील सिंचनाची तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उच्च बंधारे पूर्णत्वास आल्यास आजूबाजूच्या १० हजार ६०० हेक्टर जमीन ओलिताखाली येईल.

त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल. या सात बंधाऱ्याच्या मध्यवर्ती ठिकाणावरून परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचे समान वाटप होईल, यासाठी बेल मंडळ आणि कुर्तडी येथे वितरिका (कॅनॉल) निर्माण करण्याच्या कामासाठी सर्वे करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शेतीच्या पाणीवाटपात कुठल्याही शेतकऱ्यांसोबत दुजाभाव होणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT