Jalyukt Shiwar Agrowon
ताज्या बातम्या

Water Bunds : दौंडच्या पूर्व भागात सिमेंट बंधाऱ्यांना मंजुरी

दौंड तालुक्यातील पूर्व भागातील बोरीबेल, काळेवाडी परिसरांत ओढ्यावर तीन सिमेंट बंधाऱ्यांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

Team Agrowon

पाटस : दौंड तालुक्यातील पूर्व भागातील बोरीबेल, काळेवाडी परिसरांत ओढ्यावर तीन सिमेंट बंधाऱ्यांना (Cement Bunds) नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी बंधाऱ्यांना मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न केले होते, त्यांच्या माध्यमातून या बंधाऱ्यांचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

तालुक्यातील बोरीबेल, काळेवाडी परिसरांतील गांगर्डे वस्ती, खाडे वस्ती आणि गोविंद बर्डे यांच्या शेताजवळील सार्वजनिक ओढ्यावर सिमेंट बंधारे हवेत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत होती.

या ठिकाणी बंधारे नसल्याने पावसाळ्यात पडलेले पाणी आणि डोंगरावरून वाहणारे पाणी सरळ भीमा नदीला जाऊन मिळत होते. परिणामी, उन्हाळ्यात या भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती. या भागातील विहिरी व बोरवेलमधील पाण्याची पातळी कमी होत होती.

परिणामी, शेतपिकांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध नसल्याने शेतीपिके पाण्याअभावी जळून जात होती. त्यामुळे या ठिकाणी बंधारे बांधण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी श्री. कुल यांच्याकडे केली होती.

दर वर्षी समाधानकारक पाऊस होऊनही उन्हाळ्यामध्ये पाण्याचा या परिसरात बहुतांश ठिकाणी तुटवडा जाणवतो. याच विचाराने परिसरामध्ये ओढ्यांवर बंधारे बांधल्यास वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरेल आणि जमिनीतील पाण्याची पातळीही उंचावेल. हे बंधारे मंजूर करण्यासाठी वेळोवेळी श्री. कुल यांच्याशी पाठपुरावा केल्याने या ठिकाणी सिमेंट बंधारे मंजूर झाले आहेत. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cabinet : खानदेशात यंदा चौघांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता

Fertilizer Shortage : संयुक्त खताची टंचाई; पर्यायी खते वापरा

Jalgaon ZP : जिल्हा परिषदेत तक्रारी, अडचणींवर कार्यवाही होईना

Labor Shortage : यवतमाळ जिल्ह्यातील कामे मजुरांअभावी खोळंबली

Agrowon Podcast : कांदा भावात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आजचे लसूण दर?

SCROLL FOR NEXT