SMART Project Agrowon
ताज्या बातम्या

Smart Project : 'स्मार्ट’अंतर्गत मूल्यसाखळी उपप्रकल्पासाठी करा अर्ज

Balasaheb thackeray Agribusiness & Rural Transformation : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्थांकडून धान्य व फलोत्पादन पिकांच्या मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

Team Agrowon

Pune News : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्थांकडून धान्य व फलोत्पादन पिकांच्या मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

समुदाय आधारित संस्थेत शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचा महासंघ (फेडरेशन), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ व महिला अर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे. समुदाय आधारित संस्थेने अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना आदी माहिती https://www.smart-mh.org या संकेतस्थळारील सीबीओ टॅबमधील सीबीओ कॉर्नर या शीर्षकात उपलब्ध आहे.

इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी संकेतस्थळावरून डाउनलोड केलेल्या अर्जाच्या नमुन्यात माहिती भरून व आवश्यक कागदपत्र सोबत जोडून तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शिवाजीनगर येथील कृषी भवनमधील आत्मा कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन स्मार्ट प्रकल्पाच्या जिल्हा अंमलबजावणी कक्षाच्या प्रमुखांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT