Gokul Dudh Sangh Agrowon
ताज्या बातम्या

Gokul Dudh Sangh : गोकुळमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी, शौमिका महाडिकांचा आक्रमक पावित्रा

Kolhapur Jilha Dudh Sangh : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी (दि. १५) पार पडली.

sandeep Shirguppe

Gokul Dudh Sangh Kolhapur : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी (दि. १५) पार पडली, सभेच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर हल्लाबोल केल्यामुळे सभेला गदारोळ होण्याची शक्यता आदीच वर्तवली जात होती.

दरम्यान, सभा सुरळीत पार पाडण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्यावतीने तयारी करण्यात आली होती, तरी विरोधकांनी जोरदार विरोध करत आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रश्नांची सरबत्ती करताच सत्ताधारी गटाकडून गदारोळ होत असल्याचे पाहायला मिळाले.

गतवर्षी सभेच्या ठिकाणाचा मुद्दा पुढे करून विरोधकांनी वातावरण तापविले होते. यावर्षी 'गोकुळ'ने कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखाना परिसरातच सर्वसाधारण सभा ठेवली होती. अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी 'गोकुळ'चा कारभार चांगला चालला आहे, हे सांगत सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले होते.

सभेच्या पूर्वसंध्येलाच संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर हल्लाबोल करत कारभार सुधारा; अन्यथा 'गोकुळ'चा शेतकरी संघ होईल, असा इशारा दिला. त्यामुळे सभेच्या निमित्ताने वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे.

दरम्यान, तयारी पूर्ण झाली असून, सभेच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाच हजार खुर्च्या लावण्यात आल्या होत्या, महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली होती. तर बाजूलाच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ७५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर होती.

सभेपूर्वी मार्गावर पोस्टरबाजी 

दरम्यान, सभेच्या मार्गावर विरोधी महाडिक गटाकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. दोन वर्षात किती लिटर वासाचे दुध परत केले? कर्मचाऱ्यांना काम करू द्या, सततच्या बदल्या आणि म्हशी घेण्यासाठी दबाव कधीपर्यंत? कर्मचाऱ्यांची पिळवणूक कधी थांबणार? आमचं दुध नाकारलं, राजकारण केलं आणि बाहेरच्या राज्यातून 5.5 कोटी लिटर दूध खरेदी केले कशासाठी? उत्तर द्या. बाराशे संस्था नक्की काय साधलं?  रणजित धुमाळांकडे कोणत्या विभागाचा दूध विक्रीचा ठेका? 

आजवरचा इतिहास पाहता गोकुळच्या सभा या एक मिनिटांमध्ये गुंडाळण्यापासून ते खुर्च्या बांधून घालण्यापर्यंत पराक्रम घडले आहेत. त्यामुळे आजच्या सभेत पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 75 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सभेवर देखरेख असणार आहे. तत्पूर्वी, गुरुवारी सत्ताधारी तसेच विरोधी आघाडीकडून पत्रकार परिषद घेत सभेच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यात आली होती.

यावेळी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला होता. संघाबाबत प्रश्न विचारल्यावर सतेज पाटील काही बोलत नाहीत. कारण संघ म्हणजे महाडिकांचे ठेके आणि टॅंकर एवढ्यापुरतेच त्यांचे ज्ञान मर्यादित आहे, असेही शौमिका महाडिक म्हणाल्या. दुसरीकडे, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, सभा शांततेत पार पाडावी असे आवाहन यावेळी केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT