Marathi Language Agrowon
ताज्या बातम्या

Marathi Language : मराठीचे प्राचीन पुरावे केंद्र सरकारकडे सादर

उद्योगमंत्र्यांची माहिती; शिलालेख परिसराचे सुशोभीकरण

टीम ॲग्रोवन

अलिबाग : मराठी भाषेचे अतिप्राचीन पुरावे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला (Union Ministry of Culture) सादर करण्यात आलेले आहेत. यात अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील आद्य शिलालेख हा ठोस पुरावा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी सध्याचे राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटले आहे.

आक्षी शिलालेखाचे येथील समुद्रकिनारी असलेल्या साई मंदिर परिसरात सुयोग्य जागेत प्रस्तापित करणे व परिसर सुशोभिकरण करण्यात आले आहे. या कामांचे उद्‍घाटन सोमवारी (ता. ३१) उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषेतील आद्य शिलालेख व आणखी एक शिलालेख असे दोन शिलालेख आक्षी गावात रस्त्याच्या कडेला दुर्लक्षित अवस्थेत उभे होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शिलालेखाची पाहणी करत त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर राज्य सरकारने शिलालेख जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.

माजी पालकमंत्र्यांना निमंत्रणच नाही

प्रादेशिक पर्यटन विकास योजना; तसेच जिल्हा नियोजन समितीने या कामासाठी २२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. यासाठी तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी विशेष प्रयत्न केले होते.

त्यांच्याच उपस्थितीत या कामाचे १ मे रोजी भूमिपूजन झाले होते. पदावरून पायउतार झाल्यानंतरही अदिती तटकरे यांनी कामाचा पाठपुरावा करत तीन महिन्यांत हे काम पूर्ण करून घेतले. मात्र, आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनाच आमंत्रण देण्यात आले नव्हते. यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT