Amit Shaha  Agrowon
ताज्या बातम्या

Amul Dairy : पाच सहकारी संस्था अमूलमध्ये विलीन करणार : अमित शाह

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आसामच्या गुवाहाटी इथं ईशान्य भारत परिषदेच्या 70 व्या पूर्णसत्राची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. Co-operative Societies on Amit Shaha

Team Agrowon

अमूल आणि इतर पाच सहकारी संस्थांचे (Co-operative Societies) विलीनीकरण करून बहुराज्यीय सहकारी संस्था ((MSCS) तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अमित शाह (Amit Shaha) यांनी रविवारी दिली आहे. 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आसामच्या गुवाहाटी इथं ईशान्य भारत परिषदेच्या 70 व्या पूर्णसत्राची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शाह म्हणाले, नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारसाठी प्राधान्याची बाब आहे. नैसर्गिक उत्पादनांच्या  प्रमाणीकरणासाठी अमूल आणि इतर पाच सहकारी संस्थांचे विलीनीकरण करून बहुराज्यीय सहकारी संस्था तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.

बहुराज्यीय सहकारी संस्था प्रमाणीकरण करून उत्पादनांची निर्यात सुनिश्चित करेल जेणेकरून त्याचा नफा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड अमूल ब्रँड अंतर्गत आपली उत्पादने बाजारात आणेल.

शुक्रवारी गंगटोकमध्ये भरलेल्या नॉर्थ-ईस्टर्न कोऑपरेटिव्ह डेअरी कॉन्क्लेव्हमध्ये शाह म्हणाले की, फक्त देशांतर्गत मागणी पूर्ण करायची आहे म्हणून नाही तर शेजारच्या देशांमधील दुधाची बाजारपेठ मिळवण्यासाठी पुढच्या पाच वर्षात देशातील दुधाचं उत्पादन दुपटीने वाढविण्यावर आपण भर दिला पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT