सातारा : भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्या कडे गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये गळीताकरिता आलेल्या उसाची एफआरपीप्रमाणे (Sugarcane FRP) होणारी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली असल्याची माहिती, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
खंडाळा कारखान्याची एफआरपीची राहिलेली रक्कम या अगोदरच वर्ग करण्यात आलेली होती. २०२१-२२ मध्ये किसन वीरकडे गळीताकरिता आलेल्या संपूर्ण उसाची एफआरपीची रक्कम येत्या दोन दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या बँकेत जमा करणार असल्याची ग्वाही कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी गळीत हंगामप्रसंगी दिलेली होती.
ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांना दिलेल्या शब्दानुसार सन २०२१-२२ मध्ये गळीताकरिता आलेल्या उसाची होणारी सर्व रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांनी आपला परिपक्व झालेला संपूर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही श्री. शिंदे, प्रभारी कार्यकारी संचालक अशोक शिंदे व संचालक मंडळाने प्रसिद्धीपत्राद्वारे केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.