भामा आसखेड
भामा आसखेड Agrowon
ताज्या बातम्या

‘भामा आसखेड’ग्रस्तांना सव्वा कोटी रुपयांचे वाटप

टीम ॲग्रोवन

पुणे : खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणग्रस्तांना जमीन मोबदल्या ऐवजी भरपाईचे आर्थिक अनुदान देण्यात आले. खेड उपविभागीय कार्यालयात प्रांत विक्रांत चव्हाण यांच्या उपस्थितीत ही भरपाईची रक्कम देण्यात आली. एकूण ४९ प्रकल्पग्रस्तांपैकी १० प्रकल्पग्रस्तांना १ कोटी ३२ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले.

भामा आसखेड धरणग्रस्तांना पुनर्वसनाच्या मोबदल्याच्या वितरणासाठी सुमारे ९० प्रकल्पग्रस्तांची प्रकरणे या कॅम्पमध्ये निवडण्यासाठी ठेवण्यात आली होती. ७ प्रकल्पग्रस्तांना कागदपत्रांची पुरवण्या केल्यानंतर ३६ लाखांचे अनुदान दिले जाईल. पाच प्रकल्पग्रस्तांनी वाढीव अनुदानाची मागणी केली. भामा आसखेड धरणग्रस्तांचा प्रश्न गेली तीन दशके प्रलंबित पडला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागण्याची वेळ प्रकल्पग्रस्तांवर आली. ३८८ खातेदारांना पर्यायी जमीन देण्याचे आदेश देण्यात आले होते. तर १६० प्रकल्पग्रस्त ६५ टक्के रक्कम भरून पुनर्वसन करण्यासाठी जमीन मिळावी म्हणून उच्च न्यायालयात गेले होते.

आतापर्यंत ३४२ जण अपात्र :

आतापर्यंत ७७३ प्रकल्पग्रस्तांना ८८ कोटी २३ लाख ९५ हजार ९२६ रुपये अनुदान देण्यात आले. खास बाब अनुदानासाठी ३४२ अर्जदार अपात्र ठरले. रस्ता आणि वसाहतीसाठी संपादित क्षेत्र असलेले ३६ अर्जदार, हरकतींवर निकाली काढण्यात आलेले २९ अर्जदार असे एकूण ३४२ धरणग्रस्त अपात्र ठरविले गेले.

भामा आसखेड धरणग्रस्तांच्या ९० कोटींच्या अनुदानापैकी ४४४ खातेदारांना ४७ कोटी ६३ लाख ९५ हजार ९२६ रुपये देण्यात आले. शिल्लक अनुदानामुळे ९० खातेदारांपैकी दोन दिवसीय शिबिरातून १७ खातेदारांना १ कोटी ६८ लाख रुपये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विक्रांत चव्हाण, प्रांताधिकारी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT