Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळासाठी सर्व सहकार्य ः मुख्यमंत्री शिंदे

CM Shibde : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केली पाहणी

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
New Mumbai Airport : मुंबई : ‘‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे.

कामातील अडचणी दूर करून नियोजित वेळेत विमानतळ वाहतुकीसाठी खुले होण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल,’’असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

उलवे येथील विमानतळाची हेलिकॉप्टरद्वारे बुधवारी (ता. ७) पाहणी केली. त्यानंतर अदानी समूहाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले.

त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. विमानतळ उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.

हा प्रकल्प लवकरच लोकांसाठी खुला होईल. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लवकरच याचे उद्‍घाटन करू.’’

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की २०२४ पर्यंत हे विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला अधिक गती द्यावी, हा आजच्या पाहणीचा उद्देश आहे.

विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. मुंबईला विमानतळाच्या माध्यमातून एक चांगली भेट जनतेला देणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT