Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation : नेरधामना पूर्णा बॅरेजच्या कामासाठी जनआंदोलनाचा इशारा

जिल्ह्यात खारपाणपट्ट्यात शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण करण्याच्या उद्देशाने उभारल्या जात असलेल्या नेरधामना पूर्णा बरेज नं. २ व काटीपाटी बॅरेजचे अपूर्ण असलेले काम तातडीने केले जावे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात खारपाणपट्ट्यात शेतकऱ्यांना सिंचनाची (Irrigation) सोय निर्माण करण्याच्या उद्देशाने उभारल्या जात असलेल्या नेरधामना पूर्णा बरेज (Purna Barrage) नं. २ व काटीपाटी बॅरेजचे अपूर्ण असलेले काम तातडीने केले जावे.

अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी बुधवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. श्री. भुईभार पुढे म्हणाले, की नेरधामना पूर्णा बॅरेज नंबर २ व काटीपाटी बॅरेजचे काम मागील १० वर्षांपासून सुरू आहे.

हे काम सुरू करून पूर्ण करण्याचे आश्वासन तत्कालिन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधीग्राम येथे आले असताना दिले होते. बॅरेजलासुद्धा त्यांनी भेट दिली होती.

परंतु, त्यालाही आता पाच वर्षे लोटली. याबाबत मुख्यमंत्री व राज्यपालांना जलसिंचन संघर्ष समितीच्या वतीने वारंवार निवेदने देण्यात आली.

हिवाळी अधिवेशनात तारीख जाहीर न केल्यास जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा भुईभार यांनी दिला. या वेळी पत्रकार परिषदेला समितीचे उपाध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी सभापती शिरीष धोत्रे व इतर सदस्य उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Farmers Protest: ऊस दरावरुन 'स्वाभिमानी'चं 'काटा बंद' आंदोलन सुरु, राजू शेट्टींच्या नेतृत्त्वाखाली कराडमधील कृष्णा कारखान्यावर धडक

Water Scarcity Plan : संभाव्य पाणीटंचाईचा गावनिहाय आराखडा तयार करा

Loan Waiver List : बीडमधील ४५ हजार शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत समावेश

Hoopoe Birds: बेलपाडा मैदानावर ‘हुपू’चे आगमन

Gram Rojgar Sahayak: ग्राम रोजगार सहायकांना सहा महिन्यांचे मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी

SCROLL FOR NEXT