Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : नुकसान होऊनही अकोल्याची सुधारित पैसेवारी ५३ पैसे

शेतकऱ्यांकडून आश्‍चर्य व्यक्त; नुकसानग्रस्तांमध्ये निराशा

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात या खरीप हंगामात (Kharip Season) अतिवृष्टीमुळे (Wet Drought) शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप पिकांचे (Kharip Crop) अतोनात नुकसान (Crop Damage) झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या सुधारित पैसेवारीवर लागल्या होत्या. मात्र नुकसान झालेले असतानाही सुधारित पैसेवारी ५३ पैसे जाहीर झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली आहे.

खरिपातील लागवडी योग्य ९९० गावांमध्ये यंत्रणांनी ही पैसेवारी जाहीर केली आहे. पैसेवारी ५० पैशांवर आल्याने जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तम असल्याची मोहर शासकीय यंत्रणांच्या या पैसेवारीने लावली आहे. खरीप हंगामातील पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करीत असतो. या पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशांच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र म्हणून याकडे पाहिले जाते.

दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागते. दर वर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर होते. ऑक्टोबरमध्ये सुधारित नजरअंदाज तर डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. या पैसेवारीनंतर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवली जाते.

५० टक्क्यांच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम, असे ढोबळमानाने समजले जाते. जिल्ह्यात १०१२ गावे असून, पैसेवारीसाठी यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील सुधारित पैसेवारी सरासरी ५३ पैसे काढण्यात आली.

यापूर्वी खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ३० सप्टेंबर रोजी सरासरी ५८ पैसे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता ३१ ऑक्टोबरला प्रशासनाने सुधारित पैसेवारी ५३ पैसे जाहीर केली. डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. ही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आल्यास शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नाही, असे स्पष्ट होईल.

तालुकानिहाय खरीप पिकांची पैसेवारी

तालुका---गावे पैसेवारी

अकोला १८१ ५५

अकोट १८५ ५२

तेल्हारा १०६ ५१

बाळापूर १०३ ५४

पातूर ९४ ५१

मूर्तिजापूर १६४ ५२

बार्शीटाकळी १५७ ५३

एकूण ९९० ५३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT