Accident Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Accident Insurance : मृत खातेदारांच्या पत्नीला जिल्हा बँकेचा विमा संरक्षणाचा आधार

तिवसा येथील शिक्षक विलास जाधव यांचा अपघाताने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पश्चात पत्नी वैशाली जाधव यांना बँक संचालक दामोदर काकड यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.

Team Agrowon

Akola Accident Insurance News ः दि. अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदाराचा अपघाती (Accident) मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयास पगारदार कर्मचारी अपघात विमा योजनेअंतर्गत ३० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

तिवसा येथील शिक्षक विलास जाधव यांचा अपघाताने मृत्यू (Accidental Death) झाल्यानंतर त्यांच्या पश्चात पत्नी वैशाली जाधव यांना बँक संचालक दामोदर काकड यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.

बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने राज्यात उत्कृष्ट बँक म्हणून नावलौकीक प्राप्त केला आहे. महान शाखेत पगारदार खातेदार असलेले विलास जाधव यांचा मृत्यू झाला होता.

या योजनेअंतर्गत पगारदार शिक्षकाच्या वारसाला विमा संरक्षणाचा आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकेने कार्यवाही करून कुटुंबाला लाभ दिला.

यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक दामोदर काकड, बँकेचे व्यवस्थापक अरुण इंगोले, प्रमुख पाहुणे म्हणून तिवसा येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नानोटे, न्यू इंडिया इन्शुरन्स विमा कंपनीचे प्रतिनिधी उज्ज्वल कोरपे, देवमन पाटील, उपमुख्याधिकारी गजेंद्र शिंदे, रवींद्र महल्ले, शाखाधिकारी दीपक कोकाटे, हर्षल पाठक, विलास जायले, राजू सरोदे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भ, कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता

Banana Karpa Disease: केळीवरील करपा रोगाचे व्यवस्थापन

UPI Rule: यूपीआयच्या नियमात झाले मोठे बदल; फसवणूक टाळण्यासाठी सुधारणा

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी; HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढली!

Heavy Rain Update : बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतीपिकांचं नुकसान; खासदार ओम राजेनिंबाळकरांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

SCROLL FOR NEXT