Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar Latest News : अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; राज्याच्या राजकारणात भूकंप

Ajit Pawar Oath : राज्याच्या राजकारणात वर्षभरानंतर पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी केली आहे.

Team Agrowon

Latest News Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात वर्षभरानंतर पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी केली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राजभवनात झालेल्या समारंभात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात आता दोन उपमुख्यमंत्री असतील. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार यांच्या नंतर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राजभवनात शपथविधीची तयारी सुरू असून थोड्याच वेळात शपथविधी पार पडेल, असे सांगण्यात आले. शपथविधीला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही उपस्थित आहेत.

शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे सुध्दा बंडात सामील झाल्याने हा पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT