Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Budget Session 2023 : शेतकऱ्यांच्या जीवावर हे सरकार चाचलंय ; विधानसभेत अजित पवार आक्रमक

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे काय चाललंय आहे. शेतकरी चिंतातूर, हवालदिल झाला आहे.

Team Agrowon

Maharashtra Budget Session 2023 : राज्यातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेती पिकांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे. अस्मानीच्या संकटामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

अवकाळीच्या नुकसानीसंदर्भातील प्रस्ताव महाविकास आघाडीच्यावतीने (Mahavikas Aghadi) सभागृहात मांडण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव नाकारण्यात आल्याने विरोधीपक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत अध्यक्षांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकर्‍यांच्या जीवावर हे सरकार चालेल आहे. लाखाचा पोशिंदा संपतोय. याबाबत सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात जाब विचारला. महिला दिनी सरकार मदत करेल, शेतकऱ्यांना दिलासा देईल असे वाटले होते.

मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई जाहीर करायला हवी होती. मात्र, मदतीसंदर्भात कोणतीच घोषणा केली नाही. यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे काय चाललंय आहे. शेतकरी चिंतातूर, हवालदिल झाला आहे. हे सभागृह नियमाने चालते मान्य आहे, पण शेतकऱ्यांचे प्रश्नच सुटणार नसतील तर काय उपयोग आहे. असा संतप्त सवाल पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना केला.

कांदा खेरदीवरून अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात कुठे आणि कोणत्या केंद्रावर कांदा खरेदी झाली सुरू झाली, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. गुजरातमध्ये कांदा खरेदी सुरू झालेली आहे. पण आपल्या इकडे जाहीर केलं जाते.

त्यामागे सरकारचा हेतू चांगला असेल पण प्रत्यक्षात मात्र तसं दिसत नाही.म्हणून सदस्य पुढे येतात. सरकार सांगत असले तरी फिल्डवर तशी परिस्थिती नाही. त्यासाठी आमचा आग्रह आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारकडून न्याय मिळत नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे आम्ही सभात्याग करत आहोत, असेही पवार म्हणाले.

दरम्यान विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांसाठी मांडलेल्या प्रस्तावावर अध्यक्ष चर्चा करायला तयार नसल्याने महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होऊन वेलमध्ये उतरले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT