Air Pollution Agrowon
ताज्या बातम्या

Air Pollution : धुक्यासह एमआयडीसीतील वायू प्रदूषणामुळे धोका

दाट धुक्याबरोबरच होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे वाशी परिसरात अनेकांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी करूनदेखील प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Team Agrowon

तुर्भे, जि. नवी मुंबई : वातावरणात सध्या गारठा (Cold Weather) पडला आहे. त्यात एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर हवेत प्रदूषित वायू (Air Pollution) सोडले जात आहेत.

त्यामुळे दाट धुक्याबरोबरच (Fogg) होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे वाशी परिसरात अनेकांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी करूनदेखील प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

आठवडाभरापासून नवी मुंबईत थंडी वाढली आहे. त्यामुळे हवेत गारवा असल्याने सकाळी दाट धुके पडत आहे. अशातच रात्रीच्या एमआयडीसीतील काही रासायनिक कंपन्यांमधून प्रदूषित वायू सोडण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून वाशी विभागातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. अशी हवा आरोग्यास अतिशय खराब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हीच परिस्थिती पावणे, कोपरी सेक्टर २६, तुर्भे विभागात आहे. रात्रीच्या वेळी प्रदूषित हवेमुळे श्वास घेण्यास अडचण येत आहे.

कोपरी सेक्टर १६ भागात रात्रीच्या वेळी प्रदूषित वायू सोडण्यात येणाऱ्या कारखान्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन दिले आहे, पण त्याकडे दुर्लक्षच होत असल्याने तीव्र आंदोलन करणार आहे.
संकेत डोके, उपाध्यक्ष, भाजप, नवी मुंबई
एमआयडीसी भागातून रात्रीच्या वेळी प्रदूषित वायू सोडण्यात येणाऱ्या कारखान्यांचा शोध घेण्यासाठी भरारी पथके तयार केली आहेत. त्यांच्या माध्यमातून गस्त घालण्यात येत आहे.
जयंत कदम, उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT