Agriculture  Agrowon
ताज्या बातम्या

महाडमध्ये कृषी सप्ताह साजरा

विद्यार्थ्यांनी “जय जवान, जय किसान” हा नारा देत पालखीसह वृक्ष-दिंडीचे आयोजन केले होते. याची सुरुवात महाडमधील वीरेश्‍वर मंदिरापासून झाली.

टीम ॲग्रोवन

आचळोली, जि. रायगड ः श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषी, कृषी जैव तंत्रज्ञान आणि अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन आणि १ ते ७ जुलैदरम्यान कृषी सप्ताह साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी “जय जवान, जय किसान” हा नारा देत पालखीसह वृक्ष-दिंडीचे आयोजन केले होते. याची सुरुवात महाडमधील वीरेश्‍वर मंदिरापासून झाली. विद्यार्थांनी महाड शहरातील नागरिकांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून वृक्ष लागवडीबाबत जनजागृती केली. या वेळी तहसीलदार सुरेश काशीद, तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण कोतवाल आणि कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभव गिम्हवणेकर यांनी मार्गदर्शन केले.

त्यानंतर नागरिकांना रोपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अर्चना महाजन आणि आभार प्रदर्शन विद्या पवार यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT