Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Linking : खत लिंकिंग विरोधात सांगलीत कृषी दुकाने बंद

खत उत्पादकांनी फायद्यासाठी सदर आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करत उत्पादन जाहिरात किवा प्रोमोशनल पद्धतीने विकणे याचा सोईस्कर अर्थ म्हणजे लिंकिंग असा दाखवीत खताबरोबर लिंकिंग सुरू ठेवले आहे.

Team Agrowon

सांगली : खतासोबत उत्पादक कंपन्यांकडून होत असलेल्या अवाजवी लिकिंगच्या (Fertilizer Linking) विरोधात गुरुवारी (ता. २०) जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक विक्रेत्यांनी (Fertilizer sellers) एक दिवस कृषी दुकाने बंद (Fertilizer Sellers Strike) ठेवली.

सांगली अॅग्रिकल्चर इनपुट्‌स डीलर्स असोसिएशनतर्फे याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सांगली अॅग्रिकल्चर इनपुट्‌स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश पाटील, संजय निल्लवार, राजेंद्र पाटील, पदाधिकारी आणि कृषी सेवा केंद्राचे चालक उपस्थित होते.

सांगली जिल्हा संघटना, ऑल इंडिया असोसिएशन यांनी कृषिमंत्री, कृषी आयुक्त, केंद्रीय कृषिमंत्री व रासायनिक खतमंत्री यांच्याशी वारंवार पत्र व्यवहाराची शहानिशा व तपास करून रासायनिक खताच्या अनुषंगाने खतासोबत होणाऱ्या लिंकिंग न करण्याचे शासन निर्णय दिलेत.

खत उत्पादकांनी फायद्यासाठी सदर आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करत उत्पादन जाहिरात किवा प्रोमोशनल पद्धतीने विकणे याचा सोईस्कर अर्थ म्हणजे लिंकिंग असा दाखवीत खताबरोबर लिंकिंग सुरू ठेवले आहे. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतो आहे, त्याची दखल कृषी विक्रेता संघटनेनेही घेतली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT