Bribe  Agrowon
ताज्या बातम्या

Bribe : पंधरा हजाराची लाच घेताना कृषी अधिकाऱ्याला अटक

या प्रकरणातील तक्रारदाराचे कृषी खते, औषधे व बियाणे विक्री दुकान आहे. या दुकानात वेगवेगळ्या कंपनीचे खतांचे टॉनिक प्रॉडक्ट विक्री करू देण्यासाठी व त्यांचे दुकानावर कारवाई न करण्यासाठी कृषी अधिकारी विलास मिस्कीन याने २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

टीम ॲग्रोवन

लातूर ः येथील एका कृषी खते (Fertilizer), औषधे व बियाणे विक्री (Seed) दुकानात वेगवेगळ्या कंपनीचे खतांचे टॉनिक प्रॉडक्ट विक्री करू देण्यासाठी व त्यांचे दुकानावर कारवाई न करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक कृषी अधिकारी विलास किसन मिस्कीन (वय ५०) याला येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी गुरुवारी (ता. २१) अटक केली (Arrest In Bribe) आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराचे कृषी खते, औषधे व बियाणे विक्री दुकान आहे. या दुकानात वेगवेगळ्या कंपनीचे खतांचे टॉनिक प्रॉडक्ट विक्री करू देण्यासाठी व त्यांचे दुकानावर कारवाई न करण्यासाठी कृषी अधिकारी विलास मिस्कीन याने २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणी तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधून १९ जुलै रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर या विभागाच्या पोलिसांनी पडताळणीही केली.

गुरुवारी (ता. २१) या पोलिसांनी या तक्रारदाराचे दुकानात सापळा लावला. प्रत्यक्ष पंचा समक्ष सुरुवातीस एकूण २५ हजार रुपयांची लाचेची मागणी त्याने केली. तडजोडी अंती पंधरा हजाराची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराचे दुकानातच मिस्कीन याने पंधरा हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. यावेळी पोलिसांनी त्याला जागेवरच रंगेहाथ पकडले. या कारवाई करिता पोलिस निरीक्षक अन्वर मुजावर, भास्कर पुल्ली आदींना पुढाकार घेतला.

जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन या विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT