Agri Industrial Park  Agrowon
ताज्या बातम्या

Agri Industrial Park : सिल्लोडमध्ये कृषी औद्योगिक पार्क उभारणार

या प्रस्तावित एमआयडीसीच्या निम्म्या क्षेत्रात कृषी औद्योगिक पार्क (ॲग्रो इंडस्ट्री पार्क) उभारल्यास कृषी अन्न प्रकिया उद्योगांना चालना मिळेल.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड परिसरात प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation) (एमआयडीसी)मध्ये निम्म्या भागात कृषी औद्योगिक पार्क (Agriculture Industrial Park) आणि उर्वरित क्षेत्रावर सर्वसाधारण उद्योग उभारण्यासाठी वापरण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.

सिल्लोड येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आला. एमआयडीसी स्थापन करण्यासंदर्भात सिल्लोडचे आमदार तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याच पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती.

उद्योगमंत्र्यांसोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे सिल्लोड परिसरात एमआयडीसी सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, की सिल्लोड परिसरात एमआयडीसी सुरू करायची आहे. या प्रस्तावित एमआयडीसीच्या निम्म्या क्षेत्रात कृषी औद्योगिक पार्क (ॲग्रो इंडस्ट्री पार्क) उभारल्यास कृषी अन्न प्रकिया उद्योगांना चालना मिळेल.

तसेच उर्वरित क्षेत्र सर्वसाधारण सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी वापरल्यास औद्योगिक समतोल राखता येईल. असेही ते म्हणाले. तत्पूर्वी सिल्लोड येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, की औरंगाबाद जिल्ह्यात रोजगारासाठी उद्योग उभारणे आणि त्यांना चालना देण्याची गरज आहे. सिल्लोड परिसर हा डोंगरी भाग असून रस्ते, मुबलक पाणी अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. येत्या काळात कृषी प्रक्रिया उद्योजक आणि इतर कंपन्यांना उद्योग उभारण्याबाबत आवाहन करणार, असल्याचे मंत्री श्री. सत्तार यांनी या वेळी सांगितले.

या बैठकीला एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नाईक, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (दूरदृश्यप्रणालीद्वारे), उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगांवकर, अवर सचिव किरण जाधव, औरंगाबादचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Potato Production: पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे विक्रमी उत्पादन शक्य, साठवणूक सुविधा कमी पडणार?

Mango Fruit Protection: मोहोर करपला तरी घाबरू नका; योग्य फवारणी आणि व्यवस्थापनाने वाचवा आंब्याचे उत्पादन

Mahaniryat Ignite Workshop: महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशनच्या कार्यशाळेला लातूरमध्ये प्रतिसाद

Majhi Vasundhara Campaign: ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेमध्ये मान्याची वाडीची हॅटट्रिक

Khawa Meet Seminar: दलालांची साखळी मोडीत काढण्याचा संकल्प

SCROLL FOR NEXT