Agriculture News  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Management : नियोजन केल्यास कोणत्याही उद्योगापेक्षा शेती व्यवसाय सरस

Latest Agriculture News : कोरोना काळात अनेक उद्योग बंद पडले. त्यामुळे नोकरदारांवर उपासमारीची वेळ आली. तसेच अनेक उद्योगांनी या काळात कामगारांना सांभाळले नाही.

Team Agrowon

Nashik News : कोरोना काळात अनेक उद्योग बंद पडले. त्यामुळे नोकरदारांवर उपासमारीची वेळ आली. तसेच अनेक उद्योगांनी या काळात कामगारांना सांभाळले नाही. या काळात कामगार वर्ग आपापल्या गावी जाऊन शेती व्यवसाय करू लागला.

शेतीचे योग्य प्रकारे नियोजन केले तर कोणत्याही उद्योगापेक्षा शेती व्यवसाय हा सरस ठरेल, असे प्रतिपादन शेती व पाणी विशेषज्ञ तथा मराठवाडा शेती साह्य मंडळाचे विश्वस्त विजय बोराडे यांनी केले.

सिन्नर येथील युवा मित्र संस्थेच्या ‘सुनील स्मृती’ जलयोद्धा पुरस्कार वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोराडे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. संपत काळे, कार्यकारी संचालिका मनीषा पोटे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, उदय सांगळे आदर्श नय्यर यांच्यासह पुरस्कार्थी व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बोराडे म्हणाले, की शेतीची क्षमता कुठल्याही उद्योगापेक्षा कमी नाही. त्यासाठी पाणलोट क्षेत्रात मोठे काम होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार पिके घेतली पाहिजेत. जी पिके वर्षातील कोणत्याही ऋतुत घेता येतात त्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यासाठी मका, सूर्यफूल, रेशीम, बांबू, कर्तुल या कमी पाण्यात येणान्या पिकाची माहिती देत ही पिके घेण्याचे आवाहन केले.

कोरोना काळात गरिबांची सेवा करताना स्व. सुनील पोटे यांचा मृत्यू झाला. मात्र, कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांना वीरमरण आल्याचीही भावना त्यांनी व्यक्त करत अभिवादन केले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, उदय सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांनी आभार मानले.

पुरस्कारार्थी असे...

जलयोद्धा पुरस्कार प्रथम विजेते : संपतराव पवार (सांगली) - जल व मृद्‌ संधारण क्षेत्रात पस्तीस वर्षांहून अधिक काळ काम

द्वितीय पुरस्कार : प्रा. रामकृष्ण बोडके (बीड) - पाणलोट विकास व उपजीविका क्षेत्रात २० वर्षांहून अधिक काळ काम

‘जीवनगौरव पुरस्कार’ : भीमराव रासकर - १९९४ पासून लोककेंद्रित प्रशासन आणि बहुतांश उपेक्षित गटांच्या उपजीविकेच्या समस्यांवर काम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT