Old Pension Scheme
Old Pension Scheme  Agrowon
ताज्या बातम्या

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी कृषी सहायक, पर्यवेक्षक संघटनाही आंदोलनात उतरणार

Team Agrowon

Buldana Scheme बुलडाणा ः राज्यात जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यासाठी मंगळवार (ता. १४) पासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपात (Old Pension Protest) कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक संघटनाही सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर २००५ व त्यानंतर सेवेत हजर झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून बेमुदत संप पुकारलेला आहे.

कृषी सहायक संवर्ग हा राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा भाग असून, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे बहुतांश सदस्य हे नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत हजर झाले आहेत.

यामुळे जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे ही संघटनेची भूमिका आहे. परिणामी, या संपात संघटना १०० टक्के सहभागी राहणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष विलास रिंढे यांनी दिली आहे.

पर्यवेक्षकही सहभागी

या संपात राज्यातील सर्व कृषी पर्यवेक्षकही सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला संघटनेने पाठिंबा देत १०० टक्के सहभागी होण्याचे स्पष्ट केले आहे. या बाबत संघटनेचे राज्याध्यक्ष संजय पाटील, राज्य सरचिटणीस विक्रांत परमार यांनी आवाहन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT