Krishi Seva Kendra Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Seeds : वाशीम जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र तीन दिवस राहणार बंद

Bogus Fertilizer Act : महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित कृषी निविष्ठा कायद्यांच्या विरोधात ‘माफदा’ने राज्यात तीन दिवसीय कडकडीत बंद पाळण्याची जय्यत तयारी केली आहे.

Team Agrowon

Washim News : वाशीम जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्ह्यातील कृषी व्यावसायिक संघटनांनी घेतला आहे. तीन दिवस कृषी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी होणार आहे.

कृषी कायद्यातील प्रस्तावित पाच विधेयकाच्या विरोधात राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रीची दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डिलर्स असोसिएशनने (माफदा) ने केली आहे.

या निर्णयाला पाठिंबा दर्शवून वाशीम जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनेने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व कृषी प्रतिष्ठानने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी निविष्ठा व्यावसायिकाबाबत महाराष्ट्र शासनाने पाच प्रस्तावित नवीन कायदे लादले जात असून हे नवीन पाच प्रस्तावित कायदे जाचक आहेत. तसेच अन्याय पूर्ण आहेत.

हा कायदा लागू झाल्यास कृषी निविष्ठा व्यावसायिकांना व्यवसाय करणे अवघड होणार असून या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा केंद्र दोन ते चार नोव्हेंबर या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वाशीम जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील व रिसोड कृषी व्यावसायिक संघटनेचे तालुका अध्यक्ष मदन बगडे यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: १५ सप्टेंबरला अंतरवाली सोडणार, चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा

Pending Water Charges: ताकारीचे पाणी पाहिजे, आधी थकीत पाणीपट्टी भरा

MPSC Paper Leak : ‘एमपीएससी’ पेपरफुटीची सखोल चौकशी करा

Farmer Demands: मुक्ताईनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

Land Revenue Code: भडगाव तहसीलदारांचा पाय खोलात

SCROLL FOR NEXT