Krushik Exhibition | Agricultural Development Trust | Baramati |  Agrowon
ताज्या बातम्या

Krushik Exhibition : कृषिक प्रदर्शनचा १९ पासून बारामतीत प्रारंभ

मंगळवारी उद्घाटन; ‘सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज्’ची प्रात्यक्षिके

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या ( Agricultural Development Trust, Baramati ) कृषी विज्ञान केंद्र, (KVK) अटल इनक्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट व लंडन ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषिक २०२३ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (ता.३) होत आहे. मायकोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा व लंडन ऑक्सफर्ड विद्यापीठाचे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विभागाचे संचालक डॉ. अजित जावकर हे प्रमुख उपस्थित आहेत. शेतकऱ्यांसाठी १९ ते २२ जानेवारी दरम्यान प्रदर्शन खुले राहणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमास माजी कृषिमंत्री शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, आयसीएआरचे प्रतिनिधी, व कृषी क्षेत्रांशी निगडित नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेतक-यांसाठी हे प्रदर्शन १९ ते २२ जानेवारी दरम्यान खुले राहील. ३ ते १८ जानेवारी यादरम्यान स्टार्टअप किंवा इतर इन्होव्हेटर यांच्याकरिता वेबिनारचे आयोजन केलेले आहे. कृषिक प्रदर्शनात मायक्रोसॉफ्टमार्फत बारामती येथे उभारण्यात येणा-या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज्’ या कृषी संशोधन प्रकल्पातील अनेक प्रात्यक्षिक शेतक-यांसाठी, युवकांसाठी व नवउद्योजकांसाठी दाखविण्यात येणार आहेत.

१७० एकरवर प्रात्यक्षिक प्रकल्प प्रदर्शनामध्ये १७० एकरवर बी-बियाणे, खते, पिककिड व रोग नियंत्रण या आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. शेतक-यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, प्रिसिसीअन अॅग्रीकल्चरल, व्हर्टिकल फार्मिग, ग्रामीण शेतकरी, रोबोटचा कृषी क्षेत्रात वापर, दुग्ध आणि फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस, दूध व भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मिलेट दालन असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम पाहण्याची संधी खुली राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT