Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : संपात सहभागी कृषी सहायक करणार अवकाळीचे पंचनामे

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. शासनाकडून अद्यापही तोडगा न काढल्याने कर्मचारी संपात सहभागी आहेत.

Team Agrowon

Akola News अकोला ः राज्यात आलेल्या नैसर्गिक संकटाच्या (Natural Calamity) काळात शेतकरी हितासाठी कृषी सहायक हे संपात सहभागी (Old Pension Scheme) राहून पंचनाम्यांचे (Crop Damage Survey) काम करणार आहेत, अशी माहिती कृषी सहायक संघटनेचे कार्याध्यक्ष विलास रिंढे यांनी दिली.

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. शासनाकडून अद्यापही तोडगा न काढल्याने कर्मचारी संपात सहभागी आहेत.

यात राज्यातील कृषी सहायकही १०० टक्के सहभागी झालेले आहेत. यामुळे कामकाज ठप्प पडलेले आहे. मात्र, या संकटाच्या काळात संघटनेने उपरोक्त निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांसाठी कृषी सहायक हे पंचनामे करण्यासाठी समोर आले आहेत.

संपात सहभागी राहत ज्या-ज्या ठिकाणी पंचनामे करावे लागतील तेथे कृषी सहायक या कामात सहभागी होईल, असेही रिंढे यांनी सांगितले.

शासनाकडून पंचनामे करण्याबाबत सूचना झालेली आहे. त्यानुसार तालुका पातळ्यांवरून काही ठिकाणी निर्देशही दिल्या गेले आहेत. मात्र, पंचनामे करण्यासाठी संपामुळे कर्मचारी नसल्याचे समोर आले होते.

अखेरीस कृषी सहायक संघटनेने मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत सध्याच्या काळात पंचनामे करण्याच्या कामाबाबत सकारात्मक पाऊल उचलले आहे. कृषी सहायक हे संपात सहभागी राहून पंचनामे, अहवालाचे काम करणार आहेत.

शासनाने मागणीची दखल घ्यावी

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपाबाबत शासनाने सकारात्मक भूमिका स्वीकारावी. कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करावी, अशी मागणीही रिंढे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT