Tur and Urid  Agrowon
ताज्या बातम्या

Tur and Urid Stock : तूर आणि उडीद डाळीच्या साठ्याबाबत सरकारकडून निर्बंध, कायदा मोडल्यास होणार कारवाई

Tur Urid Export : घाऊक आणि किरकोळ व्यापारी तसेच डाळ तयार करणाऱ्या गिरण्या आणि आयातदारांनाही हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

sandeep Shirguppe

Tur and Urid Pulses : देशात तूर आणि उडीद या डाळींना मोठी मागणी असते याचबरोबर रोजच्या जेवणात याला महत्व आहे. या दोन डाळींचे दर वाढले तर याचा थेट परिणाम सामान्यांवर होतो.

म्हणून सरकारने याबाबत अधिसूचना काढत या तूर आणि उडिद डाळींचा अतिरिक्त साठा करण्यावर येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.

घाऊक आणि किरकोळ व्यापारी तसेच डाळ तयार करणाऱ्या गिरण्या आणि आयातदारांनाही हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. असे साठे आढळल्यास व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

केंद्र शासनाच्या fcainfoweb.nic.in/psp या पोर्टलवर याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार घाऊक व्यापाऱ्यांकरता तूर आणि उडीद डाळीसाठी प्रत्येकी २०० टन, किरकोळ व्यापराऱ्यांकरता ५ टन, मोठ्या साखळी दुकानांकरता प्रत्येक आऊटलेटसाटी ५ टन आणि डेपोसाठी २०० टन, गिरण्यांसाठी गेल्या तीन महिन्यातील उत्पादन किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे जास्त असेल ते लागू राहील.

निर्यातदारांना सीमा शुल्क नोंदणीच्या तारखेपासून ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर साठा करुन ठेवता येणार नसल्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ च्या कलम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत, डाळींसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होणारी कमालीची वाढ रोखण्यासाठी केंद्राने हे कायदे केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT