Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांच्या मदत निधी वाटपात हयगय करणाऱ्यांवर कारवाई

जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या शेती पिकांचे नुकसानीकरिता वाढीव दराने प्राप्त निधी अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार यांना वितरित करण्यात आलेले आहे.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीसारख्या (Natural Calamity) अतिसंवेदनशील विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या व निधी वाटप (Crop Damage Compensation) करण्याच्या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार (Disaster Management Act) कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत.

जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या शेती पिकांचे नुकसानीकरिता वाढीव दराने प्राप्त निधी अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार यांना वितरित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात निधी वाटपाची कार्यवाही पूर्ण व्हावी व नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने शासनाची मदत मिळावी याकरिता तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना जिल्ह्यातील बाधित गावांचे समप्रमाणात वाटप करून याद्या तयार करून निधी वाटप करण्याचे कळविले आहे.

राज्य ग्रामसेवक युनियन संघटना व महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना यांनी सदर कामावर बहिष्कार असल्याचे निवेदनाद्वारे कळविले आहे. ग्रामसेवक व कृषी सहायक ह्यांची कृती अशोभनीय आहे. कामकाज टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊन जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण तसेच पुढील कालावधीत दिवाळीचा सण असल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना वेळेच्या आत शासनातर्फे प्राप्त मदतनिधी वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. हे काम तत्परतेने पूर्ण करून घेण्यासाठी तालुकानिहाय नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation : पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा! 'गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार' मोहिमेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य

Bank Inspection : संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर भरारी पथकाची करडी नजर, बँकांची होणार तपासणी

Diwali With Farmers : प्रोटोकॉल बाजूला सारून थेट बळीराजाच्या दारात! उद्योगमंत्री डॉ. सामंत यांची शेतकऱ्यांसोबत अनोखी दिवाळी

Ghod River : प्रशासनाच्या आश्वासनानंतर घोड नदी पात्रातील तीव्र आंदोलन अखेर स्थगित!

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीच्या चौथ्या यादीतील ८,४८४ शेतकरी झाले कर्जमुक्त

SCROLL FOR NEXT