Sugarcane season Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Season : ऊसतोडीसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांविरोधात कारवाई

यंदाच्या हंगामात ऊसतोडणी मजूर व मुकादम यांच्याकडून ऊसतोडणीसाठी पैशांची मागणी होत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्याच्या नियुक्त केलेल्या तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.

टीम ॲग्रोवन

नगर ः गतवर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांची झालेली लूट पाहून आता कुठे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय जागे झाल्यासारखे झाले आहे. यंदाच्या हंगामात ऊसतोडणी (Sugarcane Harvesting) मजूर व मुकादम यांच्याकडून ऊसतोडणीसाठी पैशांची मागणी (Money Demand For Harvesting) होत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्याच्या नियुक्त केलेल्या तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल असे प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) कार्यालयाने सांगितले आहे.

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी जास्तीचा ऊस होता. साखर कारखाने व प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांनी समन्वय साधला नसल्याने ऊस उत्पादकांचे प्रचंड हाल झाले. साखर कारखान्यांनी सुरुवातीच्या काळात कमी दराने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणला. नंतर मात्र स्थानिक शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना पैसे देऊन ऊसतोडणी करावी लागली.

या वेळी कारखाने, प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयानेही गांभिर्याने घेतले नाही. ऊसतोडणीला पैसै मागितल्यास कारवाई करण्याबाबत गतवर्षीही असेच अधिकारी नियुक्त केले होते. एकही कारवाई झाल्याचे दिसत नाही. यंदाही गैरप्रकार थांबण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्यावर एका अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे.

कारवाई होणार का?

यंदाही ऊस अधिक असल्यामुळे साखर कारखाने सुरुवातीला बाहेरचा ऊस आणणार की कार्यक्षेत्राला प्राधान्य देणार, तसेच ऊसतोडणीला पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार का, हे पाहणे की मागचे दिवस पुढे पाहायला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT