Seed Festival Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Seed : नाशिक जिल्ह्यात बोगस बियाणे, खतांविषयी तक्रारीसाठी मोबाईल नंबर जाहीर

Bogus Fertilizer : बोगस बियाणे, खते यांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करणारा कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Team Agrowon

Nashik News : बोगस बियाणे, खते यांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करणारा कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

याच अनुषंगाने जिल्हा कृषी विभागाने आता बोगस खते व कृषी निविष्ठा विक्री होऊ नये, यासाठी कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी तत्काळ तक्रारींची दखल घेण्यासाठी मोबाईल नंबर जाहीर केला आहे.

तसेच तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर जाहीर केले असून यावर तक्रारी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडून निविष्ठा खरेदी कराव्यात. निविष्ठा खरेदी करताना सील अथवा मोहोरबंद पाकिटे/पिशव्या/बाटल्या असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पकिटावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. शेतकरी बांधवांनी परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रातूनच व पक्क्या पावतीवरच कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात.

तसेच अनुदानित रासायनिक खतांची खरेदी ही ई-पीओएस मशिनद्वारेच करावी. कमी वजनाच्या निविष्ठा व पाकिटांवरील छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री करणे तसेच मागणी व्यतिरिक्त इतर निविष्ठांची शेतकऱ्यांना सक्ती करणे हे बेकायदा असून याबाबत कृषी विभागाकडे तसेच वजनमापे निरीक्षकांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास ७८२१०३२४०८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच जवळच्या कृषी विभाग कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार, योग्य किमतीत व वेळेत कृषी निविष्ठा मिळण्याकरिता व त्यावर नियंत्रणासाठी विभागस्तरावर एक, जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर १५ अशी १७ भरारी पथके कार्यरत आहेत.

३६ परवान्यांवर कारवाई; २४९ विक्री बंद आदेश

जिल्ह्यातील गुणवत्ता निरीक्षकांमार्फत तसेच भरारी पथकांमार्फत खते १६०९, बियाणे १५९३ व कीटकनाशके ९८० असे एकूण ४ हजार १८२ विक्री केंद्रांच्या तपासण्या करण्यात आल्या. परवान्यात त्रुटी आढळून आलेल्या खतांच्या २७, कीटकनाशकांच्या ९ अशा एकूण ३६ परवान्यांवर कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.

तसेच बियाणे, खते व कीटकनाशके कायद्यातील तरतुदींचे उल्लंघनाच्या अनुषंगाने बियण्यांचे १७५, खते ६५ व कीटकनाशके ९ असे एकूण २४९ विक्री बंद आदेश देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा पुरवठा होण्याच्या अनुषंगाने बियाण्यांचे ५६१, खते २६० व कीटकनाशकांचे ८७ नमुने काढण्यात आले असून पैकी विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानुसार खतांचे १३, बियाण्यांचे ११ व कीटकनाशकांचे ३ नमुने अप्रमाणीत आढळून आले आहेत. अप्रमाणीत नमुन्यांबाबत उत्पादक कंपनी व विक्रेते यांच्यावर कायद्याअंतर्गत पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT