Paddy Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Harvesting : आदिवासी भागात भात काढणीला वेग

आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी पट्ट्यात तळेघर, पाटण, जांभोरी, पोखरी, शिवरामध्ये सध्या भात पीक काढणीला वेग आला. ‘डोंगरी शेत माझें’ या उक्तीप्रमाणे सर्व जण कामात व्यस्त असतानाचे चित्र पाहावयास मिळते.

टीम ॲग्रोवन

पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी पट्ट्यात तळेघर, पाटण, जांभोरी, पोखरी, शिवरामध्ये सध्या भात पीक काढणीला (Paddy Harvesting) वेग आला. ‘डोंगरी शेत माझें’ या उक्तीप्रमाणे सर्व जण कामात व्यस्त असतानाचे चित्र पाहावयास मिळते.

आदिवासी शेतकऱ्यांच्या भातशेती हे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. दर वर्षीपेक्षा यंदा चांगला पाऊस झाल्याने आदिवासी भागात घेतले जाणारे भात पीक यंदा चांगल्या प्रकारे आल्याने तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात गेली.

तालुक्यात ५ हजार ५०० हेक्टर एवढे एकूण भातक्षेत्र आहे. या ठिकाणी पडणाऱ्या पावसावर येथील आदिवासी आपली रोजी रोटी भरण्यासाठी पावसाच्या पाण्याची प्रतीक्षा करतात. या वर्षी चांगला पाऊस पडल्याने भात पिकाला जीवदान मिळाले आहे. आंबेगाव तालुक्याचा पश्‍चिम पट्टा प्रामुख्याने भात पिकासाठी प्रसिद्ध आहे.

डोंगर माथ्यावरून येणारे पावसाचे पाणी भात पिकांसाठी महत्त्वाचे ठरते. या ठिकाणी दरवर्षी १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. या ठिकाणचा आदिवासी बांधव भात पिकाबरोबर नाचणी, वरई, राळे, तसेच भात पिकांच्या वेगवेगळ्या प्रजातींचे पीक घेतो. यामध्ये तांबडा रायभोग, खडके, इंद्रायणी, आंबेमोहोर, बासमती आदी प्रकार येतात. सध्या सर्वत्र भात पिके काढण्याची लगबग सुरू आहे. शेताच्या बांधावर खळे करून दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन भात पिकाची झोडणी करून भाताची साळ जमवत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT