Chana Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Chana Sowing : शेलू बाजार परिसरात हरभरा पिकात कोळपणीला वेग

या परिसरात रब्बीत हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून, या पिकात सध्या शेतकरी कोळपणीचे काम जोमाने करताना दिसत आहेत. बैलजोडीच्या साह्याने शेताशेतांमध्ये कोळपणी होताना दिसून येते.

टीम ॲग्रोवन

शेलुबाजार, जि. वाशीम ः या परिसरात रब्बीत हरभऱ्याची (Rabi Chana) मोठ्या प्रमाणात लागवड (Chana Cultivation) झाली असून, या पिकात सध्या शेतकरी कोळपणीचे काम जोमाने करताना दिसत आहेत. बैलजोडीच्या साह्याने शेताशेतांमध्ये कोळपणी होताना दिसून येते.

शेतीत यंत्रांचा वापर वाढला तरी काही कामांसाठी बैलजोडीच फायदेशीर ठरते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. हरभरा पिकात सध्या कोळपणीसाठी त्यामुळेच बैलजोडीचा वापर केला जात आहे. कोळपणीमुळे पिकाची आंतरमशागत होऊन तण नियंत्रणासाठीही फायदा होतो. त्यामुळे सध्या या भागात बैलजोडीची मागणी वाढलेली आहे. आजच्या युगात शेतीतील बहुतांश कामे यंत्राने होत आहेत.

शिवाय बैलांचे प्रमाणही कमी झाले आहे. तरीही काही शेतकऱ्यांनी शेतीसाठी बैलजोड्या जोपासल्या असून शेतीच्या कामांसाठी सध्या त्यांचा वापर केल्या जात आहे. या भागात हरभऱ्याची लागवड होऊन आता अनेक ठिकाणी महिना ते दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. कुठे पहिली तर कुठे दुसरी कोळपणी शेतकरी करीत आहेत. एकदा पिकाची वाढ झाल्यानंतर मग कोळपणी करणे शक्य होत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT