Pension Scheme Protest
Pension Scheme Protest Agrowon
ताज्या बातम्या

Old Pension Scheme : जुनी पेंशन योजनेसाठी सासवड येथे आक्रोश मोर्चा

Team Agrowon

Old Pension Protestसासवड : संस्थाचालक, प्राथमिक, माध्यमिक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने सासवड (ता. पुरंदर) येथे शनिवारी (ता. १८) शिवतीर्थ ते तहसील कचेरीपर्यंत आक्रोश मोर्चाचे (Akrosh Morcha) आयोजन केले होते.

सर्वप्रथम शिवतीर्थावर विविध महामानवांस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते आणि समन्वय समितीचे प्रमुख नंदकुमार सागर, वसंतराव ताकवले, सुधाकर जगदाळे, दत्तात्रेय रोकडे, रामप्रभू पेटकर यांच्या उपस्थित पुष्पहार अर्पण करून जाहीर सभा घेतली.

यावेळी आमदार जगताप म्हणाले, ‘‘तुमची मागणी योग्य असल्याने मी तुमच्या पाठीशी खंबीर आहे. जर आम्हाला पाच वर्ष सेवा केल्यानंतर पेन्शन मिळत असेल; तर तुम्ही ३० वर्षे नोकरी करून पेन्शन मागणी करण्यात गैर काय आहे?’’

दरम्यान, विधानसभेत आमदार जगताप यांनी जुन्या पेन्शनविषयी प्रश्न उपस्थित केला आणि शिक्षकांच्या बाजूने मत मांडल्याबद्दल त्यांचे समन्वय समितीच्या वतीने जाहीर आभार मानून अभिनंदन केले.

सागर, जगदाळे, गणेश लवांडे, रोकडे, संदीप लव्हे यांनी आपल्या मनोगतात जुनी पेन्शन ही आमच्या हक्काची आहे आणि ती आम्हाला मिळालीच पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.

प्राथमिक शिक्षिका स्वाती कटके यांनी पेन्शन गीत तसेच भारुड सादर करून लक्ष वेधले. यावेळी १४ मार्च २०१३ रोजी शासनाने काढलेल्या जीआरची होळी करून निषेध व्यक्त केला. त्यानंतर हा आक्रोश मोर्चा तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी निघाला. मोर्चात तब्बल ५०० हून अधिक शिक्षक व विविध विभागातील कर्मचारी सहभागी झाले.

यामध्ये शिक्षकांसह आरोग्य, महसूल, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या प्रामुख्याने जास्त होती. निवेदन दिल्यानंतर तहसील कचेरीच्या आवारात पुन्हा जाहीर सभा झाली. यावेळी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी फोनद्वारे आपला या आक्रोश मोर्चास पाठिंबा असल्याचे जाहीर करून उपस्थित मोर्चास संबोधित केले. यावेळी संदीप कदम, राजेंद्र जगताप, कुंडलिक कुंभार, संस्थाचालक आत्माराम शिंदे, संदीप जगताप, शरद पवार आदींनी मनोगत व्यक्त केली.

संपात व या मोर्चात पुरंदर तालुका संस्थापक, प्राथमिक, माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, काँग्रेस शिक्षक सेल, शिक्षक लोकशाही आघाडी, महिला शिक्षिका संघ, सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक संघ यांचा सहभाग होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT