Milk Agrowon
ताज्या बातम्या

Milk Rate : लिटरमागे तीन रुपयांचा फटका

Milk Market : पशुखाद्यांच्या किमती कमी करण्याची दूध उत्पादकांची मागणी

Team Agrowon

बुलडाणा ः शासनाने ३४ रुपये दर निश्‍चित केल्याचे एकीकडे स्वागत असले, तरी या जिल्ह्यात मात्र दुग्ध व्यावसायिकांना सरासरी ३ रुपयांचा फटका बसतो आहे. जिल्ह्यात खासगी डेअरींकडून किमान दर ३६ ते ३७ रुपयांपर्यंत प्रतिलिटर मिळत होता. शासनाने घोषणा केल्यानंतर या खरेदीदारांनी ३४ रुपयांचा दर देणे सुरू केले.

जिल्ह्यात दूध संघ डबघाईस आल्याने दुग्धोत्पादन करणाऱ्यांना खासगी डेअरींच्या खरेदीवर अवलंबून राहावे लागते आहे. जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या डेअरींकडून हजारो लिटर दुधाची खरेदी केली जाते. विविध डेअरींनी स्थानिक भागात संकलन केंद्र उघडले असून, त्या माध्यमातून खरेदी सुरू आहे. जिल्हा संघ डबघाईस आल्यापासून जिल्ह्यातील पशुपालकांना खासगी डेअरींचा आधार अधिक आहे. या डेअरींची वाहने तालुक्यांमध्ये फिरून संकलन करीत असतात. जिल्ह्यात सुमारे दीड लाख लिटरपर्यंत हे संकलन होत असल्याचे सांगितले जाते. डेअरींमध्ये खरेदीची स्पर्धा तयार झालेली आहे. त्यामुळे दुधाला किमान ३६ ते ३७ रुपयांपर्यंत दर मिळत होता. आता ३४ रुपये निश्‍चित केल्यानंतर तातडीने त्याची या डेअरींकडून अंमलबजावणी सुरू झाली आहे.

शासनाने दुधाचा ३४ रुपये दर निश्चित केला असला तरी त्याचा फायदा कमी, उलट आम्हाला तोटा होतो आहे. कारण यापूर्वी आम्हाला ३७ रुपयांपर्यंत दर मिळायचा. दर निश्चित केल्यामुळे डेअरी चालकांनी आता तोच दर देणे सुरू केले आहे.सकाळ-संध्याकाळ मिळून ९० लिटरचा पुरवठा डेअरीला करतो. त्यामुळे प्रति लिटर तीन रुपयांप्रमाणे दररोजचे नुकसान होत आहे. दुसरीकडे पशुखाद्याचे दरही वाढत असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.

- सदाशिव साबे, रा. आडविहीर, जि.बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra : राज्यातील १४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट; मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला

Farmer Loan Waiver : कर्जमाफीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी; सहकार मंत्र्यांकडून सावरासावर

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेत दुरुस्ती करु, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे विधानसभेत आश्वासन

Farmers Protest: शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Tur Variety Selection: तुरीचे वाण निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा?

SCROLL FOR NEXT