Kisan Long March
Kisan Long March Agrowon
ताज्या बातम्या

Kisan Long March : शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

Team Agrowon

Kisan Long March शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून शेतकऱ्यांचा पायी लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर (Farmers Demand) तोडगा काढण्यासाठी सरकारमधील दोन मंत्र्यांनी बुधवारी (ता. १५) आंदोलक शेतकऱ्यांशी रोत्री उशीरा चर्चा केली.

मात्र, या चर्चेतून सकारात्म्क तोडगा निघाला नाही. या पार्श्वभूमीवर आज (ता. १६) शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यासोबत (Eknath Shinde) बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मोर्चेकरी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ (Kisan Sabha Delegation) मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.

किसान सभेच्या नेतृत्त्वात नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च विधानभवनावर धडकणार आहे. सध्या हा मार्च ठाणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यासोबत होणाऱ्या बैठकीसाठी किसान सभेचे नेते जे. पी. गावित यांच्यासह बारा जणांचे शिष्टमंडळ निघाले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासोबत आठ विभागाचे मंत्रीही या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या संबंधित विभागाशी निगडीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे.

यावेळी गावित म्हणाले, पाच दिवसांपासून शेतकऱ्यांचा पायी मार्च निघाला आहे. या मार्चवर सरकारचेही लक्ष आहे. माध्यमांच्या माध्यमातून गरीब कष्टकऱ्या शेतकऱ्यांचा हा मार्च राज्यातील घराघरात पोहोचला आहे.

यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता सरकारने सकारात्मक भूमिका घेवून शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढावे.

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केल्यास शेतकऱ्यांचे दु:ख काही प्रमाणात कमी होईल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांना न्याय देतील, असेही गावित म्हणाले.

किसान सभेचे शिष्टमंडळ

1) जे पी गावित (माजी आमदार)

2) इरफान शेख

3) इंद्रजित गावित

4) डॉ डी एल कराड

5) अजित नवले

6) उदय नारकर

7) उमेश देशमुख

8) मोहन जाधव

9) अर्जुन आडे

10) किरण गहला

11) रमेश चौधरी

12) मंजुळा बंगाळ

काल दादा भुसे आणि अतुल सावे या सरकारमधील दोन मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, याबाबत काही समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज किसान सभेच्या १२ नेत्यांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी जात आहे. दुपारी तीन वाजता विधानभवनाच्या समिती कक्षामध्ये ही बैठक होणार आहे.

दरम्यान, या बैठकीतून काही तरी सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. तसेच या दरम्यान शेतकऱ्यांचा लाँग मार्च सुरुच राहणार असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे न हटण्याची आंदोलकांची भूमिका आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT